Chief Minister Eknath Shinde Agrowon
ॲग्रो विशेष

Crop Damage E-Survey : राज्यात आता नुकसानग्रस्त पिकांचे होणार 'ई-पंचनामे'

नुकसानग्रस्त शेती पिकांचे ई-पंचनामे करण्याची घोषणा सोमवारी (ता.२४) राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली.

Team Agrowon

Crop Damage Update : नुकसानग्रस्त शेती पिकांचे ई-पंचनामे (E Survey In Crop) करण्याची घोषणा सोमवारी (ता.२४) राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Chief Minister Eknath Shinde) यांनी केली. सह्याद्री अतिथीगृहावर विभागीय आयुक्त आणि जिल्हाधिकारी परिषदेत ते बोलत होते. या परिषदेला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Deputy Chief Minister Devendra Fadnavis) व विविध विभागाचे सचिव उपस्थित होते.

यंदाच्या जूनपासून ई-पंचनामे करण्यात येणार आहेत. राज्यात अस्मानी संकटामुळे शेतकऱ्यांच्या हातातोंडाचा घास हिरावला जातो. अशावेळी शेतकऱ्यांना सरकारी मदतीच्या आधाराची गरज असते.

परंतु कासवगतीने पंचनामे केल्यामुळे शेतकऱ्यांच्या नुकसानीची अचूक आकडेवारी वेळेत मिळत नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना वेळेत मदत मिळत नाही. यावर उपाय म्हणून यंदाच्या खरीप हंगामापासून म्हणजेच जूनपासून राज्यात ड्रोन आणि उपगृहाच्या मदतीने पीक नुकसानीचे ई-पंचनामे करण्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली.

तंत्रज्ञानाचा वापर करून पंचनामे वेळेत पूर्ण होतील, तसेच शेतकऱ्यांना वेळेत मदत पोचेल असे मुख्यमंत्री शिंदेंनी यावेळी सांगितले. एसडीआरएफचे वाढीव दर लागू करण्यात आले आहेत. तसेच तीन हेक्टर मर्यादेपर्यंत शेतकऱ्यांना मदत देण्यात येत आहे.

राज्य शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी असुन त्यांना आधार देणे हेच कर्तव्य असल्याचे शिंदे म्हणाले.

मागील दोन महीने शेतकऱ्यांना गारपीट आणि वादळी पावसाने जेरीस आणलं. शेतकऱ्यांच्या कोट्यावधी रुपयांच्या पिकांचं नुकसान झालं. परंतु पंचनाम्यांचं आकडेवारी हाती न आल्याने राज्य सरकारने मदत जाहीर केली नाही.

राज्यात दरवर्षी खरीप आणि रब्बी हंगामात नैसर्गिक आपत्तीचा फेरा शेतकऱ्यांना भोगावा लागतो. वादळी पाऊस, गारपीट आणि दुष्काळ, उष्णतेची लाट इत्यादि आपत्तीमुळे शेतकऱ्यांचं नुकसान होतं.

जूनपासून संगणकीय तंत्र पद्धतीचा वापर करून पंचनामे करण्यात येणार आहेत. शेतकऱ्यांना त्यामुळे तातडीने मदत मिळेल. ई-पीक पंचनामे पारदर्शक असतील. त्यात मानवी हस्तक्षेप नसेल असंही मुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितलं.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Election Result 2024 Live : शेतकऱ्यांची नाराजी निवडणुकीत का उमटली नाही?

Tur Cultivation : बांधावरील तूर ठरतेय वरदान

Sugarcane Season 2024 : आपल्या कामाने ‘आष्टीशुगर’आघाडीवर राहील

Paddy Threshing : विक्रमगडमध्ये पारंपरिक भातमळणी

Wild Animal Attack : दोन दिवसांत दोन शेळ्यांवर बिबट्यासदृश प्राण्याचा हल्ला

SCROLL FOR NEXT