Radhakrishna Vikhe Patil Agrowon
ॲग्रो विशेष

Milk Price Hike Movement : '...आता दुग्धाभिषेक घातला आहे, नंतर शेणाने...'; दूध दर वाढीवरून ठाकरे गट आक्रमक

Radhakrishna Vikhe Patil : राज्याचे पशुसंवर्धन व दुग्धविकास मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्याच जिल्ह्यात दूध दराच्या प्रश्नावरून जोरदार आंदोलने केली जात आहेत. दूध उत्पादक शेतकरी संघर्ष समिती आक्रमक झाली असतानाच आता ठाकरे गट देखील आक्रमक झाला आहे.

Aslam Abdul Shanedivan

Ahmednagar News : राज्यातील दूध उत्पादक शेतकरी दुधाचे पडणाऱ्या दरावरून मेटाकुटीला आला आहे. यादरम्यान राज्याचे पशुसंवर्धन व दुग्धविकास मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्याच जिल्ह्यातच दूध उत्पादक शेतकरी संघर्ष समितीकडून दुधाला ४० रूपये दर देण्याची मागणी केली जात आहे. येथील अकोलेत आंदोलन केले जात आहे. याचदरम्यान आता शिवसेना ठाकरे गट देखील दूध दराच्या मागणीवरून आक्रमक झाला आहे. ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी शिर्डीत सोमवारी (त.२९) आक्रमक आंदोलन केले. तसेच मंत्री विखे यांच्या पुतळ्याला दुग्धाभिषेक घेतला. तर आता फक्त पुतळ्याला दुग्धाभिषेक केला आहे. शेतकऱ्यांची मागणी मान्य न केल्यास अंघोळ शेणाने घालू असा इशारा शिवसेना ठाकरे पक्षाचे शिर्डी शहरप्रमुख सचिन कोते यांनी दिला आहे.

राज्यातील दूध उत्पादक शेतकरी दुधाला ४० रुपये प्रतिलिटर भाव मिळावा अशी सातत्याने मागणी करत आहे. यासाठी राज्यभर आंदोलने देखील केली जात आहे. यादरम्यान दूध उत्पादक शेतकरी संघर्ष समितीकडून दूध दरवाढीसाठी अकोले ते संगमनेर अशी ट्रॅक्टर रॅली काढण्यात आली. नाशिक महामार्गावर शेण ओतून राज्य सरकारचे लक्ष वेधले.

मात्र सरकारची काही झोप उघडलेली नाही. यावरून आता सरकारला जागे करण्यासाठी उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी शिर्डीत जोरदार आंदोलन केले. तसेच विखे यांच्या पुतळ्याला दुग्धाभिषेक घालून सरकारचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला. तर दुधाला ४० रुपये भाव घेतल्याशिवाय गप्प बसणार नाही, असा इशारा यावेळी ठाकरे गटाने दिला आहे.

तसेच ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी मंत्री, दुग्धविकास विभागाचे आयुक्त, शेतकरी आणि आंदोलनकर्त्यांमध्ये वेळोवेळी बैठका झाल्या. मात्र दुधाच्या दराचा प्रश्न का सोडवला जात नाही? असा सवाल केला आहे. तर सत्ताधाऱ्यांना दुधाचा प्रश्न सोडवायचा नाही असा आरोप कोते यांनी केला आहे. तर दूध दराचा प्रश्न मार्गी लागू पर्यंत आंदोलन सुरूच राहणार आहे. आता विखे यांच्या पुतळ्याला दुग्धाभिषेक घातला आहे. पण पुढच्या आंदोलनाला शेणाचा वापर करू. त्यामुळे सरकारने आमच्यासह शेतकऱ्यांच्या संयमाचे अंत पाहू नये, असा इशारा देखील कोते यांनी दिला.

महागाई वाढत असून सध्याच्या स्थितीला दुधाचा व्यवसाय करणे जिकरीचे झाले आहे. सरकार शेतकऱ्यांकडून सर्वकाही काढून घेत असून 'जीएसटी'च्या नावाखाली सर्वसामान्यांचा खिशा कापला जात आहे. अशा वेळी दुधाचे दर वाढवून दूध उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा द्यावा, अशी मागणी सरकारला करण्यात आली. याच मागणीवर आम्ही ठाम असून सध्या संयमाने आंदोलने सुरू आहेत. पण पुढे असे होणार नाही, असा इशारा सचिन कोते यांनी दिला आहे. तर शिर्डी येथे करण्यात आलेल्या आंदोलनात शिवसेना ठाकरे पक्षाचे राहाता तालुकाध्यक्ष संजय शिंदे, जिल्हासंघटक नानासाहेब बावके यांच्यासह शेतकरी सहभागी झाले होते.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farmers Relief: शेतकऱ्यांना वीजबिल मुक्तीची पत्रे पाठविणार; मुख्यमंत्री फडणवीस

Kalyan-Latur Highway Oppose: लातूर महामार्गाला जुन्नरमध्ये तीव्र विरोध

Forest Rights Farmers Issue: वनहक्क पट्टेधारक शेतकरी ‘ॲग्रीस्टॅक’वरून ‘गायब’

Agriculture Inspection: पीक पाहणीचा पाठपुरावा करावा; ‘महसूल’च्या जिल्हाधिकाऱ्यांना सूचना

Tobacco Streak Virus: कापसावर तंबाखू स्ट्रिक विषाणू ओळखा! नियंत्रणाचे उपाय काय?

SCROLL FOR NEXT