Parliament Winter Session Agrowon
ॲग्रो विशेष

Parliament Winter Session : एक दिवस अगोदरच अधिवेशन गुंडाळले; १८ विधेयके संमत

Parliament Session : संसदेचे हिवाळी अधिवेशन आज संस्थगित करण्यात आले. या अधिवेशनात संसदेतील युवकांची घुसखोरी, जवळपास दीडशे खासदारांचे निलंबन व महत्त्वपूर्ण १८ विधेयके मंजूर करण्यात आली.

Team Agrowon

सकाळ न्यूज नेटवर्क
New Delhi : नवी दिल्ली : संसदेचे हिवाळी अधिवेशन आज संस्थगित करण्यात आले. या अधिवेशनात संसदेतील युवकांची घुसखोरी, जवळपास दीडशे खासदारांचे निलंबन व महत्त्वपूर्ण १८ विधेयके मंजूर करण्यात आली.

बहुतेक विधेयके विरोधकांच्या अनुपस्थितीत मंजूर करण्यात आली.
गेल्या ४ डिसेंबरपासून हिवाळी अधिवेशनाला सुरूवात झाली.

संसदेचे हे १४ वे सत्र होते. यात १४ दिवस कामकाज झाले. याकाळात कामकाज ६१ तास ५० मिनिटे चालले. कामकाजाची टक्केवारी ७४ टक्के होती. या गेल्या १३ डिसेंबरला दोन युवकांनी लोकसभेच्या प्रेक्षक दीर्घेतून उडी मारून धूरकांडे फोडून संसदेची सुरक्षा भेदली. यानंतर विरोधकांचा जवळपास कामकाजावर बहिष्कार राहिला.

विरोधकांनी निवेदन करण्याची मागणी लावून धरल्याने लोकसभा व राज्यसभेतील १४९ खासदारांना या सत्रासाठी निलंबित करण्यात आले. तसेच १४ खासदारांच्या वर्तणुकीबद्दल विशेषाधिकार समितीकडे प्रकरण सोपविले आहे. संसदीय इतिहासातील ही अभूतपूर्व घटनाही याच अधिवेशनात घडली.

महत्त्वपूर्ण विधेयके
अधिवेशनात काही महत्त्वपूर्ण विधेयके संमत करण्यात आली. यात फौजदारी कायद्यांमध्ये आमूलाग्र बदल करणारी तीन विधेयके याशिवाय जम्मू व काश्मीरच्या संदर्भात दोन विधेयके, निवडणूक आयुक्तांच्या नियुक्तीबद्दल, प्रेस कायद्याबद्दल, दूरसंचार विधेयकांचा समावेश आहे. विरोधकांच्या सततच्या बहिष्कारामुळे २१ डिसेंबरलाच संस्थगित करण्यात आले.

मोदी-बिर्ला यांची भेट  
अधिवेशन स्थगित झाल्यानंतर आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी खासदारांच्या वर्तनाबद्दल चिंता व्यक्त केली. विरोधकांनी संसदीय मूल्ये न पाळल्याने निलंबित व्हावे लागल्याचा त्यांनी पुनरुच्चार केला. तसेच सुरक्षेच्या संदर्भात सुद्धा कठोर उपाययोजना करण्याची आवश्यकता असल्याची सूचना त्यांनी केली.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Cotton Lalya: कपाशीवर लाल्याचा प्रादुर्भाव? योग्य कारण ओळखूनच करा उपाय

Water Storage Crisis: सांगली जिल्ह्याच्या जलसाठ्यावर संकटाचे ढग

Indian Railways : अहिल्यानगर-बीड रेल्वे प्रवास होणार सुपरफास्ट

Toll Waiver: गणेशभक्तांसाठी आनंदाची बातमी, यंदाही टोलमाफी, पास उपलब्ध

Devlali Danapur Express : देवळाली-दानापूर शेतकरी समृद्धी रेल्वेची १०० वी फेरी पूर्ण

SCROLL FOR NEXT