Swacch Bharat Mission Agrowon
ॲग्रो विशेष

Swachh Bharat Mission : स्वच्छ भारत मिशनचा दुसरा टप्पाही नागरिकांनी स्वयंस्फूर्तीने यशस्वी करावा

Swacch Bharat Mission - 2 : पंचायतराज संस्थांमधील सर्व लोकप्रतिनिधी गावपातळीवरील शासकीय कर्मचारी यांनी मिळून मिसळून यशस्वी करून दाखवावी, असे प्रतिपादन गटविकास अधिकारी राघवेंद्र घोरपडे यांनी अभियानाच्या अंतर्गत आयोजित दोन दिवसीय प्रशिक्षण कार्यक्रमाच्या समारोप प्रसंगी बोलताना केले.

Team Agrowon

Nandurbar News : ग्रामीण भागामध्ये स्वच्छ भारत मिशन टप्पा- २ ची अंमलबजावणी पारदर्शक गुणवत्तापूर्वक व्हावी, जेणेकरून गाव कचरामुक्त होतील, प्लास्टिकबंदी होईल. घनकचरा, सांडपाण्याचे व्यवस्थित व्यवस्थापन होईल म्हणून आता गावावर स्वच्छ भारत मिशनचा दुसरा टप्पा यशस्वी करण्याची जबाबदारी आली आहे.

ती पंचायतराज संस्थांमधील सर्व लोकप्रतिनिधी गावपातळीवरील शासकीय कर्मचारी यांनी मिळून मिसळून यशस्वी करून दाखवावी, असे प्रतिपादन शहादा पंचायत समिती गटविकास अधिकारी राघवेंद्र घोरपडे यांनी अभियानाच्या अंतर्गत आयोजित दोन दिवसीय प्रशिक्षण कार्यक्रमाच्या समारोप प्रसंगी बोलताना केले.

पाणीपुरवठा व स्वच्छता विभाग, महाराष्ट्र शासन, राज्य पाणी व स्वच्छ्ता मिशन, जिल्हा परिषद नंदुरबार यांच्या मार्गदर्शनाखाली नवनिर्माण सर्व समाजहितार्थ संस्था नंदुरबारतर्फे घनकचरा व सांडपाणी व्यवस्थापनकरिता भागधारकांच्या दोनदिवसीय क्षमता बांधणी प्रशिक्षणाचे आयोजन येथील हॉटेल अतिथी रेसिडेन्सी येथे करण्यात आले होते.

प्रशिक्षण अंतर्गत मानवी जीवनात स्वच्छतेचे महत्त्व, स्वच्छ भारत अभियान टप्पा क्रमांक दोनचा परिचय, घन कचरा आणि सांडपाणी व्यवस्थापन, त्यासंदर्भातील विविध उपायायोजना, शासन निधीची उप्लब्धता,

ग्रामस्थांची भूमिका व जबाबदारी, याविषयी तज्ज्ञ प्रशिक्षक सुरेश महाले, प्रकाश सोनवणे, सुशील गावित, दीपक पावरा, रवी गोसावी, प्रमोद वाणी, संजय वळवी, मालिनी गावित, मनीषा पाडवी, पूजा शर्मा यांनी प्रशिक्षण दिले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Modern Agricultural Machinery: ट्रॅक्टरचलित रोटरी खुरपणी यंत्र

Rice Farming: भात शेतीसाठी ‘एडब्ल्यूडी’ तंत्रज्ञान

First T2T Genome of Pigeonpea : देशातील पहिला 'टी2टी' जीनोम विकसित; तूर उत्पादन वाढीसाठी होणार फायदा

Sugarcane Crop Damage: अतिवृष्टिबाधित लोळलेल्या उसाचे नुकसान टाळण्यासाठी उपाययोजना

Artificial Groundwater Recharge: कृत्रिम भूजल पुनर्भरणाचे तंत्रज्ञान

SCROLL FOR NEXT