Government Scheme Agrowon
ॲग्रो विशेष

Government Scheme : केंद्र, राज्य शासनांच्या योजनांची अंमलबजावणी समन्वयाने करावी

Government Scheme Update : अधिकारी, कर्मचाऱ्यांनी केंद्र व राज्‍य शासनाच्‍या योजनांची अंमलबजावणी करतांना समन्‍वयाने कामे करावीत.

Team Agrowon

Nanded News : अधिकारी, कर्मचाऱ्यांनी केंद्र व राज्‍य शासनाच्‍या योजनांची अंमलबजावणी करतांना समन्‍वयाने कामे करावीत. लाभार्थ्‍यांना योजनेची परिपूर्ण माहिती होण्‍यासाठी गावस्‍तरावर बैठका घेवून देण्‍यात येणा-या लाभाच्‍या योजनांची माहिती देवून योजनेचा लाभ द्यावा, असे निर्देश जिल्‍हा परिषदेच्‍या मुख्‍य कार्यकारी अधिकारी तथा प्रशासक वर्षा ठाकूर-घुगे यांनी दिले.

जिल्‍हा परिषदेच्‍या यशवंतराव चव्‍हाण सभागृहात सोमवारी (ता. २९) झालेल्या समन्वय बैठकीत त्यांनी हे निर्देश दिले आहेत.

यावेळी परिविक्षाधिन आयएएस अधिकारी देवयानी यादव, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप माळोदे, प्रकल्प संचालक डॉ. संतोष तुबाकले, उप मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सुधीर ठोंबरे, मंजुषा कापसे, नारायण मिसाळ, मुख्य लेखा व वित्त अधिकारी शिवप्रकाश चन्‍ना, डॉ बालाजी शिंदे आदी उपस्थित होते.

सीईओ घुगे म्‍हणाल्‍या की, गावस्‍तरावर शासकीय योजनांची प्रचार-प्रसिघ्‍दी करण्‍यासाठी, स्‍वयंसेवी संस्‍थेसह किर्तनकार, महाराज, मौलवी, भंते आदींचा सहभाग घेतल्‍यास कामाला गती मिळेल. यासाठी गट विकास अधिकारी, विस्‍तार अधिकारी व तालुकास्‍तरावरील यंत्रणांनी नियोजन करावे, असेही निर्देशही त्यांनी दिले आहेत.

या सभेला उप मुख्‍य कार्यकारी अधिकारी रेखा काळम-कदम, शिक्षणाधिकारी डॉ. सविता बिरगे, शिक्षणाधिकारी प्रशांत दिग्रसकर, समाज कल्याण अधिकारी सत्येंद्र आऊलवार, प्रभारी कृषी विकास अधिकारी भाग्यश्री भोसले, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. भूपेंद्र बोधनकर आदी उपस्थित होते.

‘शासन आपल्‍या दारी अभियाना’चा आढावा

लोककल्‍याणकारी योजना नागरीकांपर्यंत पोहोचविण्‍यासाठी राज्‍य शासनाच्‍या वतीने सुरु असलेल्‍या शासन आपल्‍या दारी अभियानाचा त्यांनी आढावा घेतला. केंद्र व राज्‍य शासनाच्‍या योजनेत लोकसहभागाने अनेक गावांचा कायापालट केला आहे.

योजना निहाय लाभार्थ्‍यांच्‍या याद्या तयार करणे, यापूर्वी लाभ देण्‍यात आलेल्‍या लाभार्थ्‍यांची संख्‍या, नव्‍याने लाभ देण्‍यात येणा-या लाभार्थ्‍यांची विभागनिहाय यादी, लाभाचे वाटप व नियोजन या संदर्भात आढावा घेतला.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farmer Loan: शेतकऱ्यानं जीवन संपवल्यास बँका जबाबदार- महसूलमंत्री बावनकुळे

Sita Herbal Farm: अल्पभूधारक महिलांच्या ‘सीता हर्बल फार्म’ची वनौषधी उद्योगापर्यंत झेप

Crop Insurance Compensation: शेतकऱ्यांचे डोळे पीक विमा भरपाईकडे

Agricultural Cost Inflation: येत्या वर्षातही वाढणार शेतीवरील खर्च, खाद्य महागाई

Horoscope 5 October 2026 : कठीण परिस्थितीचा धैर्याने सामना कराल

SCROLL FOR NEXT