Girana Sand  Agrowon
ॲग्रो विशेष

Online Sand : ‘गिरणा’ची वाळू ‘ऑनलाइन’

Girana Sand Update : गिरणा नदीपात्रातून होणारी वाळूची चोरी रोखण्यासाठी प्रशासनाने ‘ऑनलाइन’ पद्धतीने वाळू उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला आहे.

Team Agrowon

Chalisgaon News : गिरणा नदीपात्रातून होणारी वाळूची चोरी रोखण्यासाठी प्रशासनाने ‘ऑनलाइन’ पद्धतीने वाळू उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला आहे. पहिल्या टप्प्यात रहिपुरी (ता. चाळीसगाव) बंधाऱ्यातील वाळू विक्री केली जाईल.

त्यासाठी वजनकाटा उभारण्याचे व रस्ता तयार करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. दरम्यान, या बंधाऱ्यात मोठ्या प्रमाणात गाळमिश्रीत वाळू असल्याने बंधारा फुल्ल झाला. या बंधाऱ्यातील वाळूचा ठेका देण्यात आल्याने बंधाऱ्याचे आजपर्यंत कधीही न झालेले खोलीकरणही होणार आहे.

रहिपुरी (ता. चाळीसगाव) येथील बंधाऱ्यातील गाळ मिश्रीत वाळू काढण्यासाठी बोटीच्या वापर केला जाणार आहे. काढण्यात आलेली वाळू शासकीय जागेत साठा करुन ठेवली जाईल. त्यासाठी महसूल विभागाने यापूर्वीच टेंडर काढले होते. त्यानुसार, वाळूच्या ग्राहकांना साठा केलेल्या ठिकाणाहून वाळू आपापल्या वाहनाने न्यावी लागणार आहे.

त्यासाठी ऑनलाईन मागणी करुन पैशांचा भरणा देखील ऑनलाईनच करावा लागणार आहे. नदीपात्रातून वाळू उपसा करून त्याचा साठा करण्यासाठी झालेला खर्चही ग्राहकांनाच भरावा लागणार आहे. अर्थात, ही वाळू अल्पदरात उपलब्ध होणार आहे. प्रशासनाच्या या पद्धतीमुळे नदीपात्रातून होणारा अनधिकृत वाळूचा उपसा थांबण्याला काही प्रमाणात का होईना आळा बसेल, असा अधिकाऱ्यांना विश्‍वास आहे.

बंधाऱ्याचे खोलीकरण

हिपुरी बंधारा झाला तेव्हापासून आजपर्यंत त्यातील गाळ काढलाच गेलेला नाही. परिणामी, बंधाऱ्यात त्याच्या पाणी साठवण क्षमतेपेक्षा कमी पाणी थांबत आहे. या बंधाऱ्यात गाळमिश्रीत वाळू मोठ्‍या प्रमाणावर असल्याने बंधाऱ्यात पाणी टिकून राहत नाही.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Cotton Procurement Date Extension : कापूस खरेदीला १५ मार्चपर्यंत मुदतवाढ; शेतकऱ्यांसाठी सीसीआयचा महत्वाचा निर्णय

Sugarcane FRP: ऊस उत्पादक शेतकऱ्यांची ४,६०१ कोटी एफआरपी थकीत, ४५ कारखाने रडारवर

Raisin Export: बेदाणा निर्यात ८१ टक्क्यांनी घटली, द्राक्ष उत्पादक संकटात; सरकारची कबुली

Bageshwari Lake: बागेश्वरी तलाव परिसर पर्यटनाचे नवे केंद्र

Maize Procurement: मक्याचे दर घसरले; २५ हजार क्विंटल खरेदीवर ब्रेक

SCROLL FOR NEXT