Chana Crop  Agrowon
ॲग्रो विशेष

Chana Pest Crop Damage : घाटेअळीला कंटाळून हरभरापिकावर फिरवला रोटर

Crop Damage Update : हरभरा पिकावर घाटे अळीचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढल्याने घाटे अळ्यांनी हरभरा पीक पूर्णपणे फस्त केले. त्यामुळे येथील तीन शेतकऱ्यांनी साडेचार एकरवर हरभरा पिकावर रोटर फिरवला आहे.

Team Agrowon

Beed News : चौसाळा कृषी मंडळात मागील पंधरा दिवसांत काही दिवस सारखेच ढगाळ वातावरण राहिल्यामुळे हरभरा पिकावर मर, बुरशीजन्य मर रोगांचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर झाला आहे. त्यात हरभरा पिकावर घाटे अळीचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढल्याने घाटे अळ्यांनी हरभरा पीक पूर्णपणे फस्त केले. त्यामुळे येथील तीन शेतकऱ्यांनी साडेचार एकरवर हरभरा पिकावर रोटर फिरवला आहे.

पिंपळगांव घाट येथील शेतकरी भरतरी आश्रुबा तेलप यांचे दीड एकर, राम भारत पुरी यांचे दोन एकर, युवराज श्रीधर तेलप यांचे एक एकर असे सर्व मिळून साडेचार एक्कर क्षेत्रावर असलेल्या हरभरा पिकावर घाटे अळी, बुरशीजन्य मर रोगाचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव झाल्याने त्यांनी ट्रॅक्टरने रोटर फिरवला आहे.

तसेच अवकाळी पावसाच्या आधी पेरणी झालेल्या हरभरा पिकात मोठ्या प्रमाणावर सोयाबीन उगवून आले. शेतात सोयाबीन सोबत तणाचे प्रमाण ही मोठ्या प्रमाणात उगवले आहे.

तण व्यवस्थापन तसेच कीड रोग औषध फवारणी करूनही हरभरा पीकात सुधारणा होत नसल्याने अगदी लहान लेकरांप्रमाणे संभाळलेल्या हरभरा पिकावर पिंपळगांव येथील शेतकऱ्यांनी छातीवर दगड ठेवून साडे चार एकर हरभरा पिकात ट्रॅक्टरच्या सहाय्याने रोटर घालून पिक मोडून टाकले आहे. परिणामी शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट ओढावले शेतकरी चिंताग्रस्त झाले आहेत.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Ahilyanagar District Bank Election: अहिल्यानगर जिल्हा बँक निवडणुकीत महिला मतदारसंघाकडे सर्वांचे लक्ष; दोन जागांसाठी सात उमेदवार

Maharashtra Irrigation: राज्यातील पाणी वापर संस्थांची स्थिती चिंताजनक; निष्क्रिय संस्था बंद करायच्या का? विखे पाटलांचा सवाल

Nanded Farmer Death: १० हजारांचे कर्ज, ७० हजारांची मागणी; कर्ज वसुलीसाठी शेतकऱ्याचं अपहरण अन् हत्या? फायनान्स कंपनीच्या कार्यालयात संशयास्पद मृत्यू

Crop Damage Panchnama: दोन हेक्टरच्या मर्यादेत पंचनामे करण्याचे सरकारचे आदेश; शेतकऱ्यांच्या मदतनिधीला कात्री लागण्याची शक्यता

AI in Sugarcane Farming: ‘एआय’ तंत्रज्ञानाद्वारे ऊस उत्पादन वाढीवर मार्गदर्शन; दुष्काळी परिस्थितीत कृषी विभागाची जनजागृती मोहीम

SCROLL FOR NEXT