Soybean Production Team Agrowon
ॲग्रो विशेष

Soybean Seed Production : ‘सोयाबीन बीजोत्पादनात शेतकरी उत्पादक कंपन्यांची भूमिका महत्त्वपूर्ण’

Soybean Production News: कृषी विद्यापीठांच्या सोयाबीनच्या वाणांचे दर्जेदार बियाणे शेतकऱ्यांपर्यंत वेळेवर पोहोचावे लागेल. बीजोत्पादन कार्यक्रमात शेतकरी उत्पादक कंपन्यांची भूमिका आणि योगदान महत्त्वपूर्ण राहील.

Team Agrowon

Parbhani News : कृषी विद्यापीठांच्या सोयाबीनच्या वाणांचे दर्जेदार बियाणे शेतकऱ्यांपर्यंत वेळेवर पोहोचावे लागेल. बीजोत्पादन कार्यक्रमात शेतकरी उत्पादक कंपन्यांची भूमिका आणि योगदान महत्त्वपूर्ण राहील.

केवळ बीजोत्पादन नव्हे तर विक्रीची व्यवस्था उभारावी लागेल. बियाणे निर्यातीतून शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढू शकेल, असे मत मान्यवर शास्त्रज्ञ, शेतकऱ्यांनी मांडले.

वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातील अखिल भारतीय समन्वित सोयाबीन संशोधन केंद्रातर्फे रविवारी (ता. २९) शेतकरी उत्पादक कंपनी कार्यशाळा आणि सोयाबीन प्रक्षेत्र भेट दिन कार्यक्रम घेण्यात आला.

अध्यक्षस्थानी कुलगुरू डॉ. इंद्र मणी मिश्रा होते. भारतीय कृषी संशोधन परिषदेचे सहायक महासंचालक (बियाणे) डॉ. डी. के. यादव, मउ (उत्तर प्रदेश) येथील भारतीय बियाणे विज्ञान संस्थेचे संचालक डॉ. संजय कुमार, केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण विभागाचे उपायुक्त डॉ. दिलीपकुमार श्रीवास्तव, सत्येंद्र द्विवेदी, संशोधन संचालक डॉ. खिजर बेग, बियाणे उत्पादक संघाचे अध्यक्ष ॲड. अमोल रणदिवे, सोयाबीन पैदासकार डॉ. सुनील उमाटे,

सहयोगी संचालक (बियाणे) डॉ. एच. व्ही. काळपांडे, मध्यवर्ती प्रक्षेत्राचे प्रभारी अधिकारी डॉ. विलास खर्गखराटे आदींची उपस्थिती होती. डॉ. इंद्र मणी, डॉ. संजय कुमार, डॉ. श्रीवास्तव, रणदिवे, द्विवेदी यांनी मार्गदर्शन केले. या वेळी विद्यापीठाच्या मध्यवर्ती प्रक्षेत्रावरील सोयाबीन बीजोत्पादन पाहणीसाठी शिवार फेरी काढण्यात आली.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Rain Update: कोकण, पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा सरी शक्य; उन्हाचा चटका कायम

Ratoon Sugarcane: खोडवा उसावरील एल निनोच्या उष्णतेचा ताण कसा कमी करावा?

Farmers Protest: शेतकरी अडचणीत, ऊस दर, धान खरेदी प्रश्नी राकेश टिकेत आक्रमक, मोठ्या आंदोलनाचा इशारा

Crop Damage Inspection: जिल्हाधिकारी शेताच्या बांधावर; पीक पाहणी करून साधला संवाद

Sustainable Aviation Fuel Project: शाश्वत विमान इंधन निर्मिती प्रकल्प ‘नॅचरल’ उभारणार; बी. बी. ठोंबरे यांची माहिती

SCROLL FOR NEXT