jal Jeevan Mission Agrowon
ॲग्रो विशेष

Illegal Tap Connection : बेकायदा नळजोडणीचे कनेक्शन घट्ट

Team Agrowon

Jawhar News : शंभर वर्षांपूर्वी जव्हार संस्थानातील जनतेला मूलभूत सुविधा मिळाव्यात, यासाठी येथील राजे यशवंतराव मुकणे महाराजांनी नगर परिषदेची स्थापना केली. पाणी व्यवस्था व्हावी, म्हणून जय सागर जलाशय निर्माण केले. ६०पेक्षा अधिक वर्षांपूर्वी बांधलेल्या या जलाशयावर आजही येथील नागरिकांना अवलंबून राहावे लागते.

येथील पाणी पुरत असूनही शहरातील काहींनी बेकायदा नळजोडणी घेतली आहे. त्यामुळे पाण्याची समस्या भेडसावत असते. शिवाय, नगर परिषदेचा महसूलही बुडत असल्याची परिस्थिती आहे. शहरात अनधिकृत नळजोडणीच्या माध्यमातून दररोज हजारो लिटर पाण्याची चोरी सुरू आहे. नगरपरिषद प्रशासनाकडून पाणीचोरांना अभय मिळत असल्याची तक्रार नागरिक करत आहेत.

पाणीपट्टी भरणाऱ्या नागरिकांना मात्र पुरेसे पाणी मिळत नसल्याचे वास्तव आहे. विशेष म्हणजे, अनधिकृत नळजोडणींमुळे नगरपरिषदेचे दरमहा हजारो रुपयांचे नुकसान होत आहे. जव्हार शहरात एकूण नळजोडणींची संख्या दोन हजार ५८६ इतकी आहे. घरगुती वापरासाठी दोन हजार ५०४ नळजोडणी देण्यात आली आहे.

तर केवळ ८२ ग्राहकांना वाणिज्य वापरासाठी नळजोडणी दिल्याची माहिती नगरपरिषद पाणीपुरवठा विभागातून देण्यात आली आहे. शहरातील मालमत्तांची संख्या पाहता ३० टक्के अनधिकृत नळजोडणींची संख्या असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.

बहुतांश भागात जोडणी करून चोरून पाणी वापरले जाते. अशांवर दंडात्मक कारवाई करून त्यांची अनधिकृत नळजोडणी अधिकृत करण्यासाठी प्रशासन कोणतेही ठोस पावले उचलताना दिसत नाही. दिवसेंदिवस शहराचा विस्तार होत आहे. नवीन इमारतींची संख्या झपाट्याने वाढत आहे. मात्र, ज्याप्रमाणे इमारतींची संख्या वाढते, तसे अधिकृत नळजोडणी वाढत नाही.

व्यावसायिकऐवजी घरगुती दर

शहरात २०च्या आसपास व्यावसायिक इमारती आहेत; परंतु बहुतेक इमारतींनी अधिकृतपणे नळजोडणी घेतलेली आहे का?, ही माहितीही उपलब्ध होत नाही. अधिकृत नळजोडणीधारकांकडूनही व्यावसायिक दराऐवजी घरगुती दराने पाणीपट्टी वसूल केली जाते. त्यामुळे प्रशासनाचे मोठे नुकसान होत आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Strawberry Farming : स्ट्रॉबेरी रोपवाटिकांचे पावसाने अतोनात नुकसान

Soybean Cotton Subsidy : अमरावतीतील ५८ हजार शेतकरी लाभाविना राहण्याची शक्यता

Crop Damage : चोवीस हजार हेक्टरवरील पिकांचे नांदेडमध्ये नुकसान

Soybean MSP Procurement : सरकार सोयाबीनचे पेमेंट २ दिवसांत देणार ? उद्यापासून हमीभावाने सोयाबीन खरेदीसाठी नावनोंदणी सुरु होणार

Soybean Cotton Subsidy : दीड लाखावर शेतकरी कापूस, सोयाबीन अर्थसाह्यापासून वंचित राहण्याची शक्यता

SCROLL FOR NEXT