Jayakwadi Dam Agrowon
ॲग्रो विशेष

Jayakwadi Water Project : ‘जायकवाडी’तील विसर्ग वाढवला

Jayakwadi Water Update : जायकवाडी प्रकल्पात गोदावरी पात्रातून येणारी आवक लक्षात घेता सुरक्षेच्या कारणास्तव प्रशासनाच्या वतीने गुरुवारी सकाळी ६.३० ते दुपारी २ पर्यंत पाच वेळा गोदावरीच्या नदीपात्रात टप्प्याटप्प्याने विसर्ग वाढविण्यात आला.

Team Agrowon

Chhatrapati Sambhajinagar : जायकवाडी प्रकल्पात गोदावरी पात्रातून येणारी आवक लक्षात घेता सुरक्षेच्या कारणास्तव प्रशासनाच्या वतीने गुरुवारी सकाळी ६.३० ते दुपारी २ पर्यंत पाच वेळा गोदावरीच्या नदीपात्रात टप्प्याटप्प्याने विसर्ग वाढविण्यात आला. दुपारी २ वाजताच्या सुमारास प्रकल्पाचे एकूण २७ पैकी १८ दरवाजे तीन फूट उघडून पाण्याचा विसर्ग केला जात होता.

जायकवाडी प्रकल्पातील पाणीसाठा ९९.७८ टक्क्यांपर्यंत पोहोचला होता. त्यातच परतीच्या पावसाचा जोर वाढल्याने प्रकल्पात नाशिक, नगर भागांतून गोदावरी नदीपात्राद्वारे पाण्याची आवकही वाढली आहे. असे असले तरी परतीच्या पावसाची निश्‍चिती नसल्याने एकीकडे प्रकल्प तुडुंब ठेवणे व दुसरीकडे आवक वाढत राहिल्यास खबरदारी घेण्यासाठीची दक्षता प्रशासनाला करावी लागते आहे.

गुरुवारी सकाळी ६.३० ते ७ वाजेदरम्यान २८ हजार २९६ क्युसेकने सुरू असलेला विसर्ग सकाळी ८ वाजता ३७ हजार ७२८ क्युसेकवर, सकाळी १० वाजता ४७ हजार १६० क्युसेकवर, दुपारी १२ वाजता ५६ हजार ५९२ क्युसेकवर नेण्यात आला होता. त्यात पुन्हा दुपारी २ वाजता विसर्गात वाढ करत जायकवाडीचे १८ दरवाजे ३ फूट उघडून त्याद्वारे सांडव्यामधून गोदावरीच्या पात्रात ५६,५९२ क्युसेकने पाण्याचा विसर्ग सुरू होता.

त्याचवेळी उजव्या कालव्यातून माजलगाव प्रकल्पाकरिता ५०० क्युसेकने पाणी सोडले जात होते. गुरुवारी दुपारी दोनपर्यंत प्रकल्पात ४४ हजार ७५२ क्युसेकने पाण्याची आवक सुरू होती. प्रकल्पात जिवंत पाणीसाठा ७६.१९ टीएमसी, तर एकूण साठा १०२.२६ टीएमसी झाला होता. १०२.७३ टीएमसी साठा क्षमता असलेला जायकवाडी प्रकल्प गुरुवारी दुपारी २ वाजता ९९.३९ टक्के भरलेला होता. गोदावरीच्या नदीपात्रात वाढविलेला विसर्ग लक्षात घेता प्रशासनाच्या वतीने नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

नाशिक भागात अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. प्रकल्पात पाण्याची वाढती आवक लक्षात घेता गोदावरी नदीपात्रात विसर्गवाढ करण्यात आली आहे. परतीचा पाऊस असल्याने एकीकडे प्रकल्पात आवश्यक पाणीसाठा ठेवणे आणि दुसरीकडे पूरस्थिती निर्माण होणार नाही याची खबरदारी घेण्यासाठी दक्षता घेत आहोत.
प्रशांत जाधव, कार्यकारी अभियंता, जायकवाडी पाटबंधारे विभाग

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Soybean Re-Sowing: दुबार पेरणीसाठी सरकार शेतकऱ्यांना मदत करणार, राज्य सरकारचा निर्णय, मंत्री बावनकुळेंची माहिती

Pandharpur Cycle Wari: पंढरपुरात रंगली ४ हजार सायकलस्वारांची आगळीवेगळी ‘सायकल वारी’

Kharif Sowing Delayed: पावसाच्या खंडामुळे खरिपाच्या पेरण्यांना ‘ब्रेक’

Farm Loan Waiver Scheme: लाखभर शेतकऱ्यांचा कोरा होणार ७/१२

Re Sowing Kharif: दुबार पेरणी करताना कोणती काळजी घ्यावी?

SCROLL FOR NEXT