Milk Agrowon
ॲग्रो विशेष

Milk Rate Issue : गाय दूध दरात कपात मागे घ्यावी, अन्यथा आंदोलन करू

Vilas Nale, President of Datta Doodh Sanstha : कोल्हापूर जिल्ह्यातील दूध संघांनी गाय दूध दरात केलेली कपात त्वरित मागे घ्यावी, अन्यथा मुंबई, पुणे, कोल्हापूर सारख्या शहरांना होणारा दूध पुरवठा बंद करून मोठे आंदोलन उभे केले जाईल.

Team Agrowon

Kolhapur News : कोल्हापूर जिल्ह्यातील दूध संघांनी गाय दूध दरात केलेली कपात त्वरित मागे घ्यावी, अन्यथा मुंबई, पुणे, कोल्हापूर सारख्या शहरांना होणारा दूध पुरवठा बंद करून मोठे आंदोलन उभे केले जाईल, असा इशारा सांगरूळ (ता. करवीर) येथील दत्त दूध संस्थेचे अध्यक्ष विलास नाळे यांनी दिला आहे.

दूध दर कपातीमुळे पशुपालक व्यवसाय करणारे शेतकरी अडचणीत आले आहेत. एकीकडे पशुखाद्याचे दर गगनाला भिडले आहेत. त्यात दूध खरेदी दरात तीन रुपये कपात केली आहे. बऱ्याच वर्षानंतर या व्यवसायाला काहीसा दिलासा मिळत असतानाच पुन्हा कपात करून हा व्यवसाय अडचणीत आणला जात आहे.

एका बाजूला राज्य सरकारने गाईला गोमातेचा दर्जा दिला आहे. गाईच्या दुधाला पाच रुपये प्रति लिटर अनुदान दिले आहे. दुसरीकडे दूध संघाने दूध खरेदी दरात कपात केली आहे. यामुळे दूध संघातील सत्ताधाऱ्यांना विधानसभा निवडणुकीत अपयश आल्याने ते सूड उगवत आहेत.

अशी शंका शेतकऱ्यांच्या मनात निर्माण होत आहे. यासाठी संघ प्रतिनिधींनी त्वरित तोडगा काढून गाय दूध दरात केलेली कपात मागे घ्यावी. अन्यथा मुंबई, पुणे, कोल्हापूर यासारख्या शहरांना होणारा दूध पुरवठा बंद करून मोठे आंदोलन उभे केले जाईल, असा इशारा श्री. नाळे यांनी दिला आहे. या बाबतचे निवेदन त्यांनी दूध संघ प्रतिनिधींना दिले आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Fake Agriculture Pesticide: बनावट कीडनाशकांची उलाढाल ११ हजार कोटींवर

October Heat: ‘ऑक्टोबर हीट’चा चटका वाढतोय

Maharashtra Drought Declaration: नव्याने १९ तालुके दुष्काळी

Agriculture PG Admission: पदव्युत्तर प्रवेशावरील तक्रारींवर कृषी परिषदेचा खुलासा

Sugar Hoarding Restrictions: साखरेच्या साठ्यावर केंद्राची मर्यादा

SCROLL FOR NEXT