Rain Update Agrowon
ॲग्रो विशेष

Rain Update : पाऊस लांबला अन् पेरण्याही!

Sowing Update : पाण्याची उपलब्धता असलेल्या शेतकऱ्यांनी काही प्रमाणात कपाशीची लागवड केली. इतरांनी रान तयार करून खत बियाण्याची सोय लावून ठेवणे सुरू केले.

Team Agrowon

Chhatrapati Sambhajinagar News : पाण्याची उपलब्धता असलेल्या शेतकऱ्यांनी काही प्रमाणात कपाशीची लागवड केली. इतरांनी रान तयार करून खत बियाण्याची सोय लावून ठेवणे सुरू केले. काहींची ती सोयही लागली. परंतु अजून पाऊसच न आल्याने उगवलेल्या पिकांचे अंकुर संकटात सापडले असून, शेतकरी आता आकाशाकडे पाहात आहेत.

मराठवाडा विभागातील आठही जिल्ह्यांतील वहितीखालील क्षेत्र ५४.७६ लाख हेक्टर असून, खरिपाचे क्षेत्र ४७.८७ लाख हेक्टर आहे. गतवर्षीच्या खरीप हंगामातील पेरणी खालील क्षेत्र लक्षात घेता खरीप हंगाम २०२३ साठी ४८.४० लाख हेक्टर क्षेत्र प्रस्तावित करण्यात आले आहे.

आगामी खरीप हंगामासाठी नियोजनाची, प्रस्तावित क्षेत्राची माहिती कृषी विभागाकडून देण्यात आली. त्यानुसार कापूस १३.९१ लाख हेक्टर, सोयाबीन २४.८६ लाख हेक्टर, तूर ४.४४ लाख हेक्टर, मका २.३१ लाख हेक्टर असे क्षेत्र प्रस्तावित करण्यात आले आहे.

नियोजन असले आणि शेतकऱ्यांनीही आपल्या परीने तयारी केली असली, तरी गत काही वर्षांत खरीप पेरणीसाठी अपेक्षित व अपेक्षेच्या पुढे जाऊन पडणारा पाऊस जूनचा अर्धा महिना उलटला, तरी अजून मराठवाड्यात सुरूच झाला नसल्याची स्थिती आहे. त्यामुळे शेतशिवारातील लगबग मंदावली आहे.

जिल्ह्यातील सोयगाव, सिल्लोड परिसरांत पाण्याची उपलब्धता असलेल्या शेतकऱ्यांनी २५ मे ते १० जूनदरम्यान कपाशीची लागवड केली. काहींनी कपाशीची धूळपेरणी केली. ज्यांच्याकडे पाण्याची उपलब्धता त्यांनी पेरलेले पीक उगवूनही आणले.

परंतु ज्यांच्याकडे पाण्याची उपलब्धता नाही त्यांनी अजून पेरणी सुरू केली नाही, किंवा काहींनी नुसती धूळपेरणी करून पाणी न देता पावसाची वाट पाहणे सुरू केले आहे.

शिवारातील चार-दोन शेतकऱ्यांनी उपलब्ध पाण्याच्या भरवशावर कपाशी मिरची लागवड केली. आता त्या उगवलेल्या पिकांना उपलब्ध पाण्याचा काटेकोर वापर करून जिवंत ठेवण्याचे काम सुरू आहे. पाऊस जास्त काळ लांबला, तर मग मात्र अवघड आहे. रान तयार पण पाऊसच अपेक्षित झाला नसल्याने नजरा आकाशाकडे आहे.
संजय मोरे, नळविहीरा, ता. जाफराबाद, जि. जालना
आमच्या शिवारात ६५ टक्के कपाशी लागवड उरकली. पाणी असणाऱ्यांनी ती उगवूनही आणली. तिला आता थोडं थोडं पाणी देऊन जगवणे सुरू आहे. अनेक शेतकऱ्यांनी कपाशीची धूळपेरणी करून ठेवली ते आता पावसाच्या प्रतीक्षेत आहेत.
रवींद्र पाटील, शेतकरी, जरंडी, ता. सोयगाव, जि. छत्रपती संभाजीनगर

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Election Result 2024 Live : शेतकऱ्यांची नाराजी निवडणुकीत का उमटली नाही?

Tur Cultivation : बांधावरील तूर ठरतेय वरदान

Sugarcane Season 2024 : आपल्या कामाने ‘आष्टीशुगर’आघाडीवर राहील

Paddy Threshing : विक्रमगडमध्ये पारंपरिक भातमळणी

Wild Animal Attack : दोन दिवसांत दोन शेळ्यांवर बिबट्यासदृश प्राण्याचा हल्ला

SCROLL FOR NEXT