Tur Production Agrowon
ॲग्रो विशेष

Tur Production : तुरीचे उत्पादन यंदा अत्यल्प

Tur Crop Update : जळकोट तालुक्यात यंदा पावसाअभावी खरिपातील सोयाबीनसह इतर पिकांचे उत्पादन घटले. परतीचा पाऊस आला तर शेवटी उशिरा येणारे खरिपातील तुरीचे तरी पीक हाती येईल ही आशा होती.

Team Agrowon

Jalkot News : जळकोट तालुक्यात हलक्या रानावरील तुरीच्या मळणीची लगबग सुरू आहे. यंदा पावसाने दगा दिल्याने उतारा अत्यल्प येत असल्याने शेतकरी चिंतेत असल्याचे चित्र आहे. जळकोट तालुक्यात यंदा पावसाअभावी खरिपातील सोयाबीनसह इतर पिकांचे उत्पादन घटले. परतीचा पाऊस आला तर शेवटी उशिरा येणारे खरिपातील तुरीचे तरी पीक हाती येईल ही आशा होती.

परंतु परतीचा पाऊसच तालुक्यात आला नाही. त्यामुळे तुरीचे पीक हातचे गेले. पुरेशा पावसाअभावी माळरानावरील तुरीचा खराटा झाला. त्यामुळे शेतकरी अडचणीत सापडले. त्यात हलक्या प्रतीच्या जमिनीवरील तुरीच्या काढणीस आता सुरुवात झाली आहे.

कारण दोन वेळेस तुरीच्या राशी होणार आहेत. सध्या हलक्या प्रतीच्या जमिनीवरील तूर राशीस सुरवात झाली आहे. परंतु मजुरी वाढल्याने शेतकरी अडचणीत सापडले आहेत. एकीकडे तुरीचा उतारा एवढा कमी की काढणीचा खर्च निघणे कठीण झाल्याचे शेतकरी सांगत आहेत.

उत्पादन कमी व खर्च जास्त अशा चक्रात शेतकरी सापडले आहेत. तूर मोडणे, काड जमा करणे यासाठीची मजुरी याशिवाय मळणीयंत्रासाठी अडीचशे रुपये प्रतिकट्टा (५० किलो) याप्रमाणे शेतकऱ्यांना मोजावे लागत आहेत.

तर काही शेतकरी तुरीच्या राशी बडवून करतात. कारण यामुळे जनावरांसाठी गुळी चांगली निघते. त्याला मजुरी खर्च जास्त येतो. खरिपातील शेवटचे पीक असलेल्या तुरीवर सर्व भिस्त आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farmer Loan: शेतकऱ्यानं जीवन संपवल्यास बँका जबाबदार- महसूलमंत्री बावनकुळे

Sita Herbal Farm: अल्पभूधारक महिलांच्या ‘सीता हर्बल फार्म’ची वनौषधी उद्योगापर्यंत झेप

Crop Insurance Compensation: शेतकऱ्यांचे डोळे पीक विमा भरपाईकडे

Agricultural Cost Inflation: येत्या वर्षातही वाढणार शेतीवरील खर्च, खाद्य महागाई

Horoscope 5 October 2026 : कठीण परिस्थितीचा धैर्याने सामना कराल

SCROLL FOR NEXT