Ginger Seed  Agrowon
ॲग्रो विशेष

Ginger Seeds Procurement : आले बियाण्याची खरेदी एप्रिलअखेर सुरू राहणार

Ginger Farming : आले बियाणे काढणीच्या कामांना वेग आला असून एप्रिलअखेर बियाणे खरेदी सुरू राहणार आहे. बियाण्याच्या प्रतिगाडीस विक्रमी म्हणजेच ५० ते ५५ हजार रुपये दर सुरू आहे.

विकास जाधव 

Satara News : आले बियाणे काढणीच्या कामांना वेग आला असून एप्रिलअखेर बियाणे खरेदी सुरू राहणार आहे. बियाण्याच्या प्रतिगाडीस विक्रमी म्हणजेच ५० ते ५५ हजार रुपये दर सुरू आहे. तर आले (धुणीच्या) पिकांस प्रतिगाडी (५०० किलो) ४० ते ४२ हजार रुपये दर मिळत आहे. बियाण्याच्या दरात विक्रमी वाढ झाली असली तरी सरासरी इतक्या क्षेत्रात लागवड होण्याचा अंदाज तज्ज्ञांकडून व्यक्त केला जात आहे.

आले पिकांस गतवर्षीपासून चांगले दिवस आले आहेत. गतवर्षी प्रतिगाडीस विक्रमी ७० ते ७५ हजार रुपये दर मिळाला होता. त्यानंतर दरात घसरण होऊन ३० ते ३५ हजारांपर्यंत दर गेले होते. डिसेंबरपासून दरात पुन्हा सुधारणा होत गेली. फेब्रुवारीमध्ये आले पिकांचे (धुणीच्या) आल्यास ३५ हजार रुपयांपर्यंत दर होते.

मार्चमध्ये दरात सुधारणा होत जाऊन सध्या प्रतिगाडीस ४५ ते ४७ हजार रुपयांपर्यंत दर मिळाले होते. एप्रिलच्या सुरुवातीस अल्प प्रमाणात दर कमी होऊन गाडीस ४० ते ४२ हजार रुपयांपर्यंत दर मिळत आहेत. मात्र ही घट अल्प काळासाठी असून पुढील काळात दरात सुधारणा होण्याचा अंदाज आहे.

बियाणे खरेदी एप्रिलअखेरपर्यंत सुरू रहाण्याचा अंदाज आहे. अनेक शेतकऱ्यांचे आले पीक उशिरा सुप्तावस्थेत गेल्याने बियाणे काढणीही उशिरा केली जात आहे. अपुऱ्या पावसाचा परिणाम आले पिकावर दिसून येत आहे. मेमध्ये उन्हाची तीव्रता वाढत असल्याने अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर आले पिकाची लागवड होत नाही. पाणी टंचाई, उन्हाची तीव्रता यामुळे जून अखेरपर्यंत लागवड सुरू राहणार आहे. खेरदी केलेले बियाणे किमान दोन महिने ठेवावे लागत असल्याने बियाणे खरेदीही उशिरा केली जात आहे.

आले ठेवण्यावर भर

सध्या आले पिकाचे दर समाधानकारक आहेत. यामुळे पुढील काळात दरात वाढ होईल किंवा दर टिकून राहतील, असा व्यापाऱ्यांचा अंदाज आहे. त्यामुळे आल्याची विक्री न करण्याकडे शेतकऱ्यांचा कल आहे. आले जमिनीत ठेवल्यावर त्यांची वाढ सुरू होते. त्यामुळे उत्पादनात वाढ होते. यामुळे शेतकरी आले ठेवत आहेत. यामुळे कधी नव्हे ते व्यापारी आल्यासाठी शेतकऱ्यांकडे मागणी करित असल्याचे चित्र आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Shiv Sena Split Case: शिंदेंनी कोणत्या आधारे 'मुख्य नेता' पद स्वतःला बहाल केलं? ठाकरेंच्या वकिलांचा जोरदार युक्तिवाद

Rain Damage Compensation: अतिवृष्टीग्रस्तांसाठी ३९ कोटींच्या निधी वाटपाला गती

Krantisinha Nana Patil Award : क्रांतिसिंह नाना पाटील पुरस्कार’ राजू देसले यांना

Farmers Loan Waiver: शेतकऱ्यांची कर्जमुक्तीकडे वाटचाल

Koyna Dam Water : कोयना धरणातून पाण्याचा विसर्ग पूर्णपणे बंद

SCROLL FOR NEXT