Jowar Fodder Agrowon
ॲग्रो विशेष

Jowar Fodder : ज्वारीचा कडबा शेकडा ५००० ते ५५०० रुपये

Jowar Fodder Rate : दादर ज्वारीची मळणी, काढणी सुरू; चारा उपलब्ध

Team Agrowon

अॅग्रोवन वृत्तसेवा
Jalgaon News : जळगाव ः खानदेशात दादर ज्वारीचा कडबा उपलब्ध होण्यास सुरुवात झाली आहे. त्याचे दर ५००० ते ५५०० रुपये प्रतिशेकडा असे आहेत. ज्वारीची मळणी, काढणी सुरू झाल्याने काही भागात कडबा उपलब्ध होण्यास सुरुवात झाली आहे.

यंदा खरिपात कमी चारा दुष्काळी स्थितीमुळे उपलब्ध झाला. यामुळे चाराटंचाई आतापर्यंत आहे. दुधाळ पशुधनाला कोरडा चारा दुरापास्त झाला आहे. माळरानात चारा नाही. तूर, सोयाबीनचा भुसाही संपत आला आहे. अशा स्थितीत पशुधनाला पुरेसा चारा खाऊ घालणे कठीण बनले होते. यात आगाप पेरणीच्या दादर ज्वारीचा कडबा उपलब्ध होण्यास सुरुवात झाली आहे. पुढे अधिकचा चारा उपलब्ध होईल.

खानदेशात बाजार समित्या किंवा अन्य भागांत दादर ज्वारीच्या कडब्याची आवक होत नाही. खरेदीदार थेट शिवार किंवा गावातून कडब्याची खरेदी करतात. कडबा खरेदी करून त्याची कुट्टी केली जाते. लागलीच ही कुट्टी वाहतूक करून तिचा साठा केला जातो. खानदेशात धुळ्यातील दुधाळ पशुपालक जळगाव, चोपडा व अन्य भागातून चाऱ्याची खरेदी करीत आहेत. काही खरेदीदार बुलडाणा भागातही चाऱ्यासाठी जात आहेत. रावेर, मध्य प्रदेशातील बऱ्हाणपूर भागातील दुधाळ पशुपालक व अन्य शेतकरी जळगाव, चोपडा, शिरपूर भागातून दादरच्या कडब्याची खरेदी करीत असल्याची स्थिती आहे.

यंदा दर काहीशी वाढ
कोरडवाहू दादर ज्वारीच्या कडब्याचे दर अधिकचे आहेत. हा कडबा यंदा दुरापास्त आहे. तो फक्त तापी, अनेर नदीच्या क्षेत्रात उपलब्ध आहे. कोरडवाहू दादर ज्वारीची पेरणी दिवाळीच्या काळात काळ्या कसदार जमिनीत जळगाव, चोपडा, अमळनेर, धुळ्यातील शिरपूर आदी भागांत झाली होती. या क्षेत्रात पीक मळणी सुरू आहे. काही भागात पीक मळणीवर आले आहे. मागील वर्षी दादर ज्वारीच्या कडब्याचे दर प्रतिशेकडा ५००० रुपयांपर्यंत होते. यंदा दर काहीसे अधिक आहेत.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Gladiolus Farming: डोंगराळ नागालॅंडमध्ये ग्लॅडिओलसची यशस्वी शेती

Fruit Farming: आपल्या फळांची प्रतिमा दुय्यम का?

Cyclone Threat: वेध चक्रीवादळांचा!

Pune Ganesh Festival: पुण्यात गणेशोत्सवाला दिमाखात प्रारंभ

Rice Crop Update: पावसाची उघडीप; भात पिके वाढीच्या अवस्थेत

SCROLL FOR NEXT