Onion Market Agrowon
ॲग्रो विशेष

Nagar Onion News : नगरमध्ये कांद्याला साडेचार हजार रुपयांपर्यंत दर

Nagar Onion Market Rate : मागील आठ दिवसांच्या तुलनेत कांद्याच्या दरात काहीशी घसरण झाल्याचे पाहायला मिळत आहे, नेहमीच्या तुलनेत कांद्याची आवकही कमी आहे.

Team Agrowon

Ahmednagar Onion News : नगर येथील दादा पाटील शेळके कृषी उत्पन्न बाजार समितीत कांद्याला प्रतिक्विंटल सरासरी साडेचार हजार रुपयांपर्यंत दर मिळत आहे. मागील आठ दिवसांच्या तुलनेत कांद्याच्या दरात काहीशी घसरण झाल्याचे पाहायला मिळत आहे, नेहमीच्या तुलनेत कांद्याची आवकही कमी आहे.

नगर येथील दादा पाटील शेळके कृषी उत्पन्न बाजार समितीत गावरान कांद्याची साधारणपणे ८० हजार ते एक लाख गोण्यांपर्यंत आवक होत असते. सध्या गावरान कांद्याची आवक कमी झाली आहे. सध्या केवळ ४० ते ४५ हजार गोण्यांपर्यंत कांद्याची आवक होत आहे.

नगरमध्ये एक नंबरच्या गावरान कांद्याला प्रतिक्विंटल ३४०० ते ४५०० रुपयांचा दर मिळाला आहे. दोन नंबरच्या कांद्याला २१५० ते ३४०० रुपये, तीन नंबरच्या कांद्याला १४५० ते २१५० रुपये व चार नंबरच्या कांद्याला ७०० ते १४५० रुपयांचा प्रतिक्विंटल दर मिळत आहे.

घोडेगाव, पारनेर, राहुरी, कोपरगाव, राहता श्रीरामपूर, अकोले या बाजार समित्यांतही यात तुलनेत कांद्याला दर मिळत आहे.

नगर जिल्ह्यात खरीप, लेट खरीप, रब्बी आणि उन्हाळ मिळून साधारण दोन लाख हेक्टर क्षेत्रापेक्षा अधिक कांदा लागवड होत असते. यंदा मात्र पाऊस नाही, पाणी साठवण झालेले नाही. यामुळे कांदा लागवडीवर परिणाम होण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.

यंदा खरिपाची दरवर्षीच्या तुलनेत कमी लागवड झाली. तर रब्बी हंगामातही कांदा लागवड फारसा वेळ घेताना दिसत नाही. यापुढे कांदा लागवड होईल की नाही याचीही शाश्वती नाही. त्यामुळे दरवर्षीच्या तुलनेत यंदा कांदा लागवड निम्म्याने घटणार असल्याचे सांगण्यात येत आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farm Loan Waiver: कर्जमाफी योजनेची प्रत्यक्ष अंमलबजावणी सुरु, शेतकऱ्यांची पहिली यादी जाहीर

Pandharpur Vitthal Darshan: दर्शन रांगेतील वयोवृद्ध दांपत्याला थेट विठ्ठल दर्शन

Kharif Crop Insurance: शेतकऱ्यांची खरीप पीकविम्याकडे पाठ

Fake Soybean Seed Issue: बोगस बियाण्यांच्या तक्रारीवर उलट शेतकऱ्यांवरच प्रश्नांचा भडिमार

Agriculture Scheme Subsidy Issue: परभणी जिल्ह्यातील ६७० शेतकरी अद्यापही अनुदानाच्या प्रतीक्षेत

SCROLL FOR NEXT