Marigold Agrowon
ॲग्रो विशेष

Marigold Rate : दीपोत्सवात झेंडूचा भाव वधारला

Diwali Festival : एपीएमसी बाजारात मोठ्या प्रमाणात झेंडूच्या फुलांची आवक झाली आहे. पिवळ्या आणि भगव्या रंगांच्या झेंडूच्या फुलांनी बाजार बहरला आहे.

Team Agrowon

Washi News : एपीएमसी बाजारात मोठ्या प्रमाणात झेंडूच्या फुलांची आवक झाली आहे. पिवळ्या आणि भगव्या रंगांच्या झेंडूच्या फुलांनी बाजार बहरला आहे. दिवाळीत झेंडूच्या फुलांना विशेष महत्त्व असल्याने नागरिक झेंडू खरेदी करण्यासाठी बाजार परिसरात मोठी गर्दी करत आहेत.

यंदा झेंडूचे चांगले उत्पन्न झाले असून झेंडूच्या फुलांना चांगला भाव मिळत असल्याने शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण असून नागरिकांच्या खिशाला मात्र ऐन दिवाळीत कात्री लागलेली पाहायला मिळत आहे. सध्या वाशीतील एपीएमसीत कमी प्रतीचा झेंडू १०० ते १२० रुपये; तर आकाराने मोठा आणि उत्तम प्रतीचा झेंडू २०० ते २५० रुपये किलोने विकला जात आहे.

दिवाळीत दारावर झेंडूच्या फुलांचे तोरण, दुकानांची सजावट, वाहनांना झेंडूच्या माळा बांधण्याची परंपरा पूर्वापार चालत आलेली आहे. नवरात्रोत्सव, दसरा आणि दिवाळीत लक्ष्मीपूजनाच्या वेळी मोठ्या प्रमाणात झेंडूच्या फुलांचा वापर केला जातो. त्यामुळे झेंडूच्या फुलांना विशेष मागणी असते.

दिवाळीनिमित्त बाजार परिसर झेंडूच्या फुलांनी बहरला असला तरी झेंडूच्या दराने चांगलीच उसळी घेतली आहे. गेल्या आठवड्यात ४० ते ६० रुपये दराने विकल्या जाणाऱ्या झेंडूचे दर तब्बल दोन ते तीन पटीने वाढले आहेत. एपीएमसीत कमी प्रतीचा झेंडू १०० ते १२० रुपये किलोने विकला जात असून आकाराने मोठा आणि उत्तम प्रतीचा झेंडू २०० ते २५० रुपये किलोने विकला जात आहे.

एपीएमसीतील इतर फुलांचे भाव

फुले किलो/नगाचे भाव (रु.)

मोगरा ९००

कणेरी ३२०

शेवंती ३२०

जरबेरा २००

चाफा ३ नग - ५०

गुलाब १ नग - ३०

जास्वंदी २ नग - ३०

कमळ १ नग - ४०

फुलांच्या वाढत्या किमतीमुळे तीन ते चार किलो फुले खरेदी करणारे ग्राहक आता अर्धा किलो, एक किलो खरेदी करीत आहेत. लक्ष्मीपूजनानंतर फुलांची कमतरता जाणवेल आणि भाव वाढतील.
- शैलेंद्र यादव, विक्रेता, नवी मुंबई

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Crop Damage Inspection: जिल्हाधिकारी शेताच्या बांधावर; पीक पाहणी करून साधला संवाद

Sustainable Aviation Fuel Project: शाश्वत विमान इंधन निर्मिती प्रकल्प ‘नॅचरल’ उभारणार; बी. बी. ठोंबरे यांची माहिती

Crop Insurance Compensation: हवामान मापक यंत्रावरील नोंदणी ग्राह्य धरून पीकविमा परतावा द्या : महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे

Railway Protest: रेल्वेचा निर्णय होईपर्यंत आंदोलन सुरूच ठेवणार; संगमनेरकरांचा इशारा

Weekly Weather: महाराष्ट्रातून मॉन्सून बाहेर पडण्याच्या मार्गावर

SCROLL FOR NEXT