Dairy Business Agrowon
ॲग्रो विशेष

Dairy Business : दूध वजन काटे रद्द होण्याची शक्यता

Milk Meter : राज्यातील दूध संस्थांमध्ये खरेदी-विक्रीसाठी वापरण्यात येणारे वजन काटे अचूक असावेत. या काट्यांवर १०० मिलिपेक्षा कमी दुधाचे मोजमाप होत नाही.

Team Agrowon

Mumbai News : राज्यातील दूध संस्थांमध्ये खरेदी-विक्रीसाठी वापरण्यात येणारे वजन काटे अचूक असावेत. या काट्यांवर १०० मिलिपेक्षा कमी दुधाचे मोजमाप होत नाही. त्यामुळे दूध उत्पादकांचे मोठे नुकसान होत आहे.

यामुळे हे काटे अचूक करावेत, अशी मागणी करण्यात आली. मात्र अन्न व नागरी पुरवठा विभाग हे काटेच रद्द करण्याची शक्यता असून त्यासबंधी चर्चा करण्यासाठी बुधवारी (ता. १८) बैठक बोलविण्यात आली आहे.

दरम्यान, या बैठकीला वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ यांना बोलविण्याचे आदेशही देण्यात आले आहेत. मुश्रीफ यांची कोल्हापुरातील गोकुळ या संस्थेवर सत्ता असल्याने त्यांना बोलविण्यात आल्याचा आरोप तक्रारकर्ते रूपेश पाटील यांनी केला आहे.

राज्यातील दूध संस्थांमध्ये सध्या मापाऐवजी वजन काट्यावर दूध संकलन केले जाते. या इलेक्ट्रॉनिक वजन काट्यांवर १०० मिलिपेक्षा कमी दुधाचे मोजमाप होत नाही. १०० ग्रॅमची सूट ही एका दिवशी १ हजार किलो वजनाच्या वजन काट्यासाठी वापरली जाते. पण दूध संस्थांमध्ये शंभर ते दीडशे किलो वजनाच्या काट्यांसाठी मात्र १०० ग्रॅमचे मोजमाप केले जात नाही.

याचे कारण दूध उत्पादकांचे दैनंदिन हजारो मिली अतिरिक्त दूध संस्थेला मिळत असते. वास्तविक दूध उत्पादकांना ते मिळणे गरजेचे आहे. ‘‘दुधाचे मोजमाप अचूक व्हावे, यासाठी वैधमापनशास्त्र विभागाने १२ ऑक्टोबर रोजी आदेश दिले आहेत. त्यात दूध मोजमाप करणाऱ्या इलेक्ट्रॉनिक वजन काट्यांमध्ये १० मिलि कमी मोजमाप होऊ नये, असे आदेश दिल्याने त्याचे शेतकऱ्यांनी स्वागत केले.

बहुतांश दूध संस्थांनी त्याचे पालन करण्याचे मान्य केले. मात्र ‘गोकुळ’ने हे आदेश धाब्यावर बसविले आहेत. या संघाचे चेअरमन अरुण डोंगळे यांनी वजन काट्यांबाबत देण्यात आलेले आदेश पाळण्यास नकार दिला आहे,’’ असे पाटील यांनी सांगितले.

तक्रारकर्ते रुपेश पाटील हे दूध उत्पादक नाहीत. त्यांनी केलेल्या तक्रारी संदर्भात मंत्री भुजबळांकडे म्हणणे मांडले. एक काटा दुरुस्त करण्यासाठी संस्थेला सात हजार रुपयांचा भूर्दंड पडेल. हा कंपन्यांचा फायदा आहे . बैठकीत या संदर्भात निर्णय होईल.
- अरुण डोंगळे, अध्यक्ष, गोकुळ.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Sangli DCC Bank: सांगली जिल्हा बँक निवडणुकीसाठी २४४५ मतदार

Sericulture Farming : पावसाने इतर पिकं गेली, तुती-रेशीम ठरलं आधार; ४ एकरांतून लाखोंचं उत्पन्न | Agrowon

Veterinary Staff Shortage: राधानगरीत रिक्त पदांमुळे जनावरांच्या उपचारात अडचणी

Rain Deficit Impact: पावसाने केळी लागवडीला ‘ब्रेक’

Akola Farmer Loan Waiver: अकोला जिल्ह्यातील ११ हजार ५० शेतकऱ्यांची दुसरी यादी जाहीर

SCROLL FOR NEXT