Dam Canal Agrowon
ॲग्रो विशेष

Pimpalgaon Joge Canal : पिंपळगाव जोगे धरणाच्या कालव्याची दुरवस्था

Canal Condition : पिंपळगाव जोगा (ता. जुन्नर) येथील धरणाच्या कालव्याची दुरवस्था झाली आहे. अनेक ठिकाणी सिमेंट काँक्रीट उघडले असून, कालव्यात झाडेझुडपे मोठ्या प्रमाणात वाढली आहेत.

Team Agrowon

Junnar News : पिंपळगाव जोगा (ता. जुन्नर) येथील धरणाच्या कालव्याची दुरवस्था झाली आहे. अनेक ठिकाणी सिमेंट काँक्रीट उघडले असून, कालव्यात झाडेझुडपे मोठ्या प्रमाणात वाढली आहेत.

जुन्नर तालुक्यातील पिंपळगाव जोगा धरणातून कालव्याला आवर्तन सोडण्याआधीच कुकडी पाटबंधारे विभागाने पाहणी करून, ज्या ठिकाणी सिमेंट काँक्रीट उघडले आहे तेथे डागडुजी करावी. झाडाझुडपांची साफसफाई करून संभाव्य पाणी गळती थांबवण्यासाठी उपाय योजना करावी, अशी मागणी कालव्याच्या बाजूच्या शेतकरी तसेच नागरिकांकडून होत आहे.

कालव्याला आवर्तन सोडण्याआधी पाण्याच्या प्रवाहातील अडथळे दूर करून पाणी गळती थांबवावी, अशी मागणी पिंपळगाव जोगा, डिंगोरे, उदापूर, ओतूर, खामुंडी, डुंबरवाडी, गायमुखवाडी, पिपरीपेंढार, वडगाव आनंद व आळेफाटा व इतर पुढील गावाच्या कालव्या लगतच्या शेतकऱ्यांनी केली आहे.

प्रत्येक वर्षी पिंपळगाव जोगा धरणातून जुन्नर तालुक्यातील पूर्व भागासाठी तसेच नगर जिल्हासाठी कालव्याद्वारे आवर्तन सोडण्यात येते. मात्र त्यातील लाखो लिटर पाणी दुरवस्था व गळतीमुळे वाया जाते.

लाखो लिटर पाण्याची गळती थांबवा

धरणातून कालव्यात पाण्याचे आवर्तन सोडण्याआधीच कुकडी पाटबंधारे विभागाने पिंपळगाव जोगा कालव्याची पूर्ण पाहणी करून ज्या भागात कालवा फुटायची शक्यता आहे. त्याठिकाणी डागडुजी करावी आणि प्रत्येक आवर्तनाला होणारी लाखो लिटर पाण्याची गळती थांबवावी, अशी मागणी कालव्याच्या दोन्ही बाजूला असलेल्या शेतकऱ्यांकडून होत आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agriculture Irrigation Issues: प्रकल्पांच्या कालवा वितरण प्रणालीची दुरावस्था

Sunetra Pawar NCP National President: राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी सुनेत्रा पवार, एकमताने निवड

Onion Price Crisis: कांदा उत्पादक समितीचे काय झाले?; सत्यजीत तांबेंचा सरकारला सवाल

Grape Care After Rain: द्राक्षाला अवकाळीचा फटका? बाग वाचवण्याचे सोपे उपाय

Grape Farming: वातावरणातील बदलांनुसार पाणी बचतीवर भर आवश्यक

SCROLL FOR NEXT