Dharashiv DCC Bank Agrowon
ॲग्रो विशेष

Dharashiv DCC Bank : थकबाकीदार संस्थांच्या पदाधिकाऱ्यांची हजेरी

Co-Operative Bank : या समितीने बँकेला सावरण्यासाठी प्रयत्न सुरू केले असून शुक्रवारी (ता. १९) समितीने पहिल्याच बैठकीत मॅरेथॉन चार तास आढावा घेत भक्कम नियोजन केले.

Team Agrowon

Dharashiv News : रोखे गैरव्यवहारामुळे गेली काही वर्ष अडचणीत असलेल्या जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेला आर्थिक अडचणीतून बाहेर काढण्यासाठी राज्य सरकारच्या सहकार विभागाने जिल्हाधिकारी डॉ. सचिन ओम्बासे यांच्या अध्यक्षतेखालील समिती स्थापन केली आहे.

या समितीने बँकेला सावरण्यासाठी प्रयत्न सुरू केले असून शुक्रवारी (ता. १९) समितीने पहिल्याच बैठकीत मॅरेथॉन चार तास आढावा घेत भक्कम नियोजन केले. त्याचा पहिला भाग म्हणून थकबाकीदार संस्थांच्या पदाधिकाऱ्यांना आता दर गुरुवारी जिल्हाधिकाऱ्यांसमोर हजेरी लावावी लागणार आहे.

डॉ. ओम्बासे यांनी हे आदेश देतानाच सहकार कायद्याच्या कलम १०१ नुसार वसुली प्रमाणपत्र मिळालेल्या संस्थांविरुद्ध कडक कारवाई करण्याची सूचनाही त्यांनी केली. बँकेच्या आर्थिक स्थितीत सुधारणा करण्यासाठी सरकारने डॉ. ओम्बासे यांच्या अध्यक्षतेखाली संनियंत्रण समिती स्थापन केली आहे. नागपूर व वर्धा जिल्हा बँकेच्या धर्तीवर स्थापन समितीची पहिली बैठक शुक्रवारी जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनात झाली.

समिती सदस्य तथा विभागीय सहनिबंधक सुनील शिरापूरकर, सेवानिवृत्त जिल्हा उपनिबंधक एस. आर. नाईकवाडी, शिखर बँकेचे प्रादेशिक व्यवस्थापक गंगाधर एस. चवरे, सदस्य सचिव तथा जिल्हा उपनिबंधक बालाजी काळे, बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विजय घोणसे पाटील यांच्यासह अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. बैठकीत डॉ. ओम्बासे यांनी बँकेच्या अडचणी व स्थिती सुधारण्यासाठीच्या संधीवर सर्वांची मते जाणून घेतली.

त्यानंतर जिल्ह्यातील सर्व सहकारी संस्थांना त्यांचे व्यवहार जिल्हा बँकेमार्फत करण्याचे आवाहन करून समितीच्या पुढील बैठकीसाठी साखर कारखान्यांच्या अध्यक्षांना निमंत्रित करण्याची सूचना केली. सर्व संस्थांनी जिल्हा बँकेचे सभासदत्व घ्यावे, मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना व अन्य सरकारी योजनेचे खाते शून्य रक्कमेत उघडणे, मयत थकबाकीदार शेतकरी सभासदांकडील कर्जाच्या वसुलीसाठी विशेष सवलत योजना राबवणे, व्यवस्थापन खर्च बचतीसाठी शाखांच्या विलीनीकरणासह इच्छुक कर्मचाऱ्यांसाठी व्हीआरएस (स्वेच्छा निवृत्ती) योजना राबविणे, आदी सूचना केल्या.

वीजबिल बचतीसाठी सौर यंत्रणा

बँकेच्या वीजबिल बचतीसाठी सरकारी योजनेतून योजनेतून सोलार यंत्रणा उपलब्ध करून देण्यासाठी प्रस्ताव सादर देण्याची सूचना करत राज्य सरकारकडून थकहमीची रक्कम मिळण्यासाठी व बँकेस भाग भांडवलापोटी ७४ कोटी मिळवून देण्यासाठी पाठपुरावा करण्याची हमी डॉ. ओम्बासे यांनी दिली. विविध कार्यकारी सेवा संस्थांसाठी केंद्र सरकारच्या वतीने राबवण्यात येणाऱ्या विविध योजनांमध्ये संस्थांनी सहभाग घ्यावा व बँकेला गतवैभव मिळवून देण्यासाठी सहकार चळवळीतील सर्व घटकाने आपले योगदान द्यावे, असे आवाहन डॉ. ओम्बासे यांनी केले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farmers Protest: आंबा, काजू उत्पादकांचा मोर्चा मुंबईत रोखला, राजू शेट्टी, महादेव जानकरांची पोलिसांकडून धरपकड

Agrowon Podcast: सोयाबीनमध्ये चढ उतार; कापूस टिकून, मक्याचा भाव दबावातच, बाजरी आवकेचा दबाव, तूर स्थिरावली

Illegal Water Lifting: अवैध पाणी उपसा; तलावांवरील मोटारी हटविण्याचे आदेश

Lower Terna Project: निम्न तेरणा प्रकल्पाचा कारभार वाऱ्यावर

Land Acquisition: शेतकऱ्यांच्या भूसंपादनाचा निधी तातडीने द्या : मंत्री प्रकाश आबिटकर

SCROLL FOR NEXT