Textile Production  Agrowon
ॲग्रो विशेष

Wool Production : लोकरी निर्मितीसाठी गुणवत्तापूर्ण धाग्यांची गरज आणि उत्पादनाच्या संधी

Diwali Ank 2024 : वस्त्रनिर्मितीसाठी गुणवत्तापूर्ण धाग्यांची आवश्यकता असते. लोकरदेखील त्याला अपवाद नाही. याबाबत डॉ. टेकाडे म्हणाले, की ग्रामीण भागात मांस उत्पादनाच्या बरोबरीने लोकरीला विणकामाच्या दृष्टीने मागणी आहे.

अमित गद्रे

Quality of Wool : वस्त्रनिर्मितीसाठी गुणवत्तापूर्ण धाग्यांची आवश्यकता असते. लोकरदेखील त्याला अपवाद नाही. याबाबत डॉ. टेकाडे म्हणाले, की ग्रामीण भागात मांस उत्पादनाच्या बरोबरीने लोकरीला विणकामाच्या दृष्टीने मागणी आहे. राज्याच्या विविध भागांत मेंढीपालनाच्या बरोबरीने भटक्या जमाती-क प्रवर्गातील सनगर जमातीमधील कुटुंब लोकरीचे विणकाम पारंपरिक पद्धतीने करतात. लोकरीपासून घोंगडी, जेन तयार केली जाते, त्याला कारणही तसेच आहे.

जागतिक पातळीवर मेंढीच्या लोकरी धाग्याच्या जाडीनुसार फाइन लोकर (२० मायक्रॉनपेक्षा कमी जाडी), कारपेट लोकर (२० ते ४० मायक्रॉन जाडी) आणि कोर्स लोकर (४० मायक्रॉनच्या पुढे जाडी) असे प्रकार आहेत. जागतिक पातळीवर विणकामासाठी फाइन लोकरीस प्राधान्य आहे, कारण त्यापासून धागा व्यवस्थित तयार होतो. तयार होणारे वस्त्र मुलायम असते. मात्र फाइन लोकर थंड प्रदेशामधील मेंढ्यांपासूनच मिळते.

आपल्या दख्खनी मेंढीची लोकर ही भरड (कोर्स) प्रकारात येते. जाडी ६० मायक्रॉन पुढे असल्याने धागा निर्मिती अवघड जाते. ही लोकर जेन निर्मितीसाठी वापरली जाते. तसेच काही प्रमाणात धागा तयार करून घोंगड्या विणल्या जातात.

अनेक अडचणी असल्या तरी पुन्हा एकदा जगभरातील बाजारपेठेत दख्खनी मेंढीच्या लोकरीस महत्त्वाचे स्थान देण्यासाठी महामंडळाने लोकरीपासून घोंगडी, जेन या पारंपरिक उत्पादनांच्या बरोबरीने चादर, सतरंजी, शाल, मफलर, कारपेट, चेअर आसन आदी उत्पादनांच्या निर्मितीला चालना दिली आहे. यातून पारंपरिक मेंढपाळ तसेच युवा उद्योजकांसाठी नवी अर्थव्यवस्था उभी राहण्यासाठी गती मिळणार आहे.

राज्यात दरवर्षी १५०० टन लोकरीचे उत्पादन होते. त्यातील केवळ ५ ते १० टक्के लोकर घोंगडी, जेन निर्मितीसाठी वापरली जाते. उर्वरित लोकर दुय्यम दर्जाची असल्याने फेकून दिली जाते. अजूनही पारंपरिक पद्धतीने लोकर कातरणी केली जाते. मेंढपाळ स्थलांतरित होत असल्याने त्यांच्या तळावरून लोकरीची वाहतूक परवडत नाही.

सध्या घोंगडी निर्मिती करणारे कारागीर दहा ते वीस रुपये किलो दराने लोकरीची खरेदी करतात. परंतु गुणवत्तापूर्ण लोकर कातरणी केली तर निश्चितपणे २५ ते ५० रुपये किलो दर मिळू शकतो. यापासून चांगल्या धाग्यांची निर्मिती करता येते. त्यासाठी आधुनिक यंत्रणा उपलब्ध होत आहेत.

(संपूर्ण लेख वाचा अॅग्रोवन दिवाळी अंकात...)

अंकासाठी संपर्क-९८८१५९८८१५

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Vasantrao Naik: पहिले शेतकरी मुख्यमंत्री

Orchard Nutrient Management : फळपिकांसाठी एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापन महत्त्वाचे

Agriculture PhD Education: अधिछात्रवृत्तीअभावी कृषी संशोधन धोक्यात

Onion Storage Shed : कांदा चाळीने सोडविली साठवणुकीसह दरांची समस्या

Dragon Fruit Farming : ड्रॅगन फ्रूट ठरले आश्‍वासक

SCROLL FOR NEXT