Sunil Kedar Agrowon
ॲग्रो विशेष

Sunil Kedar : सुनील केदार यांचा कारागृहातील मुक्काम वाढला; न्यायालयाने फेटाळला जामीन

Bank fraud case : नागपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक घोटाळा प्रकरणी काँग्रेस नेते व माजी माजी मंत्री, आमदार सुनील केदार यांना न्यायालयाने दोषी ठरवले होते. त्यांना बँक घोटाळा प्रकरणात न्यायालयाने पाच वर्षांची शिक्षा ठोठावली होती.

Aslam Abdul Shanedivan

Nagpur News : नागपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक घोटाळा प्रकरणी काँग्रेस नेते व माजी मंत्री सुनील केदार यांना धक्यावर धक्के बसत आहेत. मागिल आठवड्यात केदार यांना ट्रायल कोर्टाने केदार यांना झटका देताना बँक घोटाळा प्रकरणी पाच वर्षांची शिक्षा ठोठावली होती. त्यापाठोपाठ शनिवार (३० रोजी) नागपूर सत्र न्यायालयाने केदार यांना मोठा धक्का दिला आहे. न्यायालयाने त्यांचा जामीन फेटाळला आहे. त्यामुळे केदार यांच्या अडचणीत वाढ झाली असून त्यांना आता आणखीन काही दिवस कारागृहातच राहवं लागणार आहे.

गेल्या आठवड्यात ट्रायल कोर्टाने केदार यांच्यासह सहा आरोपींना दोषी ठरवत शिक्षा ठोठावली होती. तर केदार यांना बँक घोटाळा प्रकरणी पाच वर्षांची सुनावली होती. त्यानंतर सत्र न्यायालयात त्यांच्या जामिनावर सुनावणी सुरू होती.

शनिवारी झालेल्या सुनावणीत नागपूर सत्र न्यायालयाने केदार यांचा जामीन फेटाळला. तसेच केदार यांना सुनावलेली शिक्षा चुकीची असल्याचे कुठलेही पुरावे सादर करण्यात आलेले नाहीत. त्यामुळे त्यांना जामीन देता येणार नाही. तर त्यांना जामीन दिल्याने समाजात चुकीचा संदेश जाईल असे मत न्यायालयाने नोंदवले आहे. केदार यांचा जामीन फेटाळण्याबरोबरच दोषसिद्धीला स्थगितिची मागणी देखील न्यायालयाने फेटाळून लावली.

केदार यांच्या जामीन आणि दोषसिद्धीला स्थगितिची सुनावणी अतिरिक्त सत्र न्यायाधीश आर. एस. पाटील (भोसले) यांच्या न्यायालयापुढे झाली. यावेळी अतिरिक्त सत्र न्यायाधीश यांनी हा आदेश दिला. तसेच केदार यांच्यासह एक अन्य आरोपी अशोक चौधरींचाही जामीन न्यायालयाने फेटाळला. तर इतर आरोपींच्या जामिनावर २ जानेवारीला सुनावणी होणार आहे.

काय आहे बँक घोटाळा प्रकरण?

नागपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत २००२ मध्ये १५० कोटींचा घोटाळा झाला होता. घोटाळा झाला तेंव्हा बँकेचे अध्यक्ष सुनील केदार होते. तर बँकेने २००२ मध्ये १५२ कोटी रुपयांपेक्षा अधिक रकमेच्या सरकारी रोखी खरेदी केल्या होत्या. त्यावरून केदार यांच्यासह सहा जणांवर आरोपपत्र दाखल करण्यात आले होते.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Shiv Sena Split Case: शिंदेंनी कोणत्या आधारे 'मुख्य नेता' पद स्वतःला बहाल केलं? ठाकरेंच्या वकिलांचा जोरदार युक्तिवाद

Rain Damage Compensation: अतिवृष्टीग्रस्तांसाठी ३९ कोटींच्या निधी वाटपाला गती

Krantisinha Nana Patil Award : क्रांतिसिंह नाना पाटील पुरस्कार’ राजू देसले यांना

Farmers Loan Waiver: शेतकऱ्यांची कर्जमुक्तीकडे वाटचाल

Koyna Dam Water : कोयना धरणातून पाण्याचा विसर्ग पूर्णपणे बंद

SCROLL FOR NEXT