MP Nagesh Ashtikar  Agrowon
ॲग्रो विशेष

Loksabha Oath Ceremony : ‘जय संविधान’च्या घोषणांसह खासदारांनी घेतली शपथ

Oath of Lok Sabha Membership : महाराष्ट्रातील खासदारांनी मंगळवारी (ता. २४) जय संविधान, जय भीम, जय शिवरायच्या घोषणा देत लोकसभा सदस्यत्वाची शपथ घेतली.

Team Agrowon

New Delhi : महाराष्ट्रातील खासदारांनी मंगळवारी (ता. २४) जय संविधान, जय भीम, जय शिवरायच्या घोषणा देत लोकसभा सदस्यत्वाची शपथ घेतली.

शपथ घेताना शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे व वडिलांना स्मरून शपथ घेत असल्याबद्दल हिंगोलीचे शिवसेनेच्या ठाकरे गटाचे खासदार नागेश आष्टीकर यांना हंगामी अध्यक्ष भर्तुहरी महताब यांनी चांगलीच समज दिली व पुन्हा शपथ घेण्यास भाग पाडले.

लोकसभा सभागृहाचे मंगळवारी कामकाज सुरू झाल्याबरोबर महाराष्ट्रातील खासदारांची शपथ सुरू झाली. सोमवारी २६२ सदस्यांनी शपथ घेतली होती. पहिल्यांदा नंदूरबारचे खासदार गोवाल पाडवी यांनी हिंदीतून शपथ घेतली.

या वेळी त्यांनी हातात राज्यघटनेची प्रत घेतली होती. यानंतर येणाऱ्या प्रत्येक सदस्याने जय संविधान, जय भीम, जय शिवराय, जय हिंद अशा घोषणा देत शपथ घेतली. महाराष्ट्रातील बहुतेक सदस्यांनी मराठीतून शपथ घेतली. परंतु काहींनी हिंदी व इंग्रजीतूनही शपथ घेतली.

मणिपूरवर सर्वाधिक टाळ्या

महाराष्ट्रातील खासदारांचा शपथविधी पार पडल्यानंतर लगेच मणिपूरच्या दोन खासदारांनी शपथ घेतली. मणिपूरचे खासदार शपथ घ्यायला आल्याबरोबर काँग्रेससह सर्व विरोधकांनी बाके वाजवून त्यांचे स्वागत केले. या वेळी राहुल गांधी यांनी मणिपूरच्या खासदाराला राज्यघटनेची प्रत दिली व ती हातात घेऊन शपथ घेण्याचे सुचविले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Sugarcane Dues : थकीत ऊस बिलासाठी १० ऑगस्टला ठिय्या आंदोलन

Crop Damage Compensation: सहा जिल्ह्यांतील शेतकऱ्यांना दिलासा, शेतपिकांच्या नुकसानीसाठी ५ कोटी ५४ लाख मदत मंजूर

MAT Stay : भूवैज्ञानिक भरतीला ‘मॅट’कडून अंतरिम स्थगिती

Farmer Loan Waiver: आधार ई-केवायसीसाठी शुल्क आकारल्यास कठोर कारवाई : जिल्हाधिकारी राहुल कर्डिले

Yavatmal Crop Insurance : यवतमाळच्या विम्यासंदर्भात सकारात्मक निर्णय घेऊ

SCROLL FOR NEXT