Ravikant Tupkar Agrowon
ॲग्रो विशेष

Farmer Loan Waiver: कर्जमुक्तीसाठीचे आंदोलन गनिमीकाव्याने करणार: रविकांत तुपकर

Ravikant Tupakar: कर्जमुक्ती, पीकविमा, भावांतर योजना, ऊस देयक, वन्यप्राण्यांपासून संरक्षण अशा शेतकऱ्यांच्या मूलभूत मागण्यांसाठी क्रांतिकारी शेतकरी संघटनेने जून महिन्यात ‘गनिमी काव्याने’ राज्यव्यापी तीव्र आंदोलनाची घोषणा केली आहे.

माणिक रासवे : अॅग्रोवन वृत्तसेवा

Parbhani News: राज्य सरकारने कर्जमुक्तीप्रश्नी घूमजाव केले. त्यामुळे आता ‘करो या मरो’ या स्थितीत सरकारकडून कर्जमुक्ती घेणार आहोत. शेतकरी कर्जमुक्ती, पीकविमा, सोयाबीन, कापूस शेतीमालास भावांतर योजना लागू करावी यासह शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर जून महिन्यात गनिमी काव्याने राज्यव्यापी तीव्र आंदोलन करणार आहोत. शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी महाराष्ट्रात रान उठविणार आहोत, असे क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष रविकांत तुपकर यांनी शुक्रवारी (ता. १६) पत्रकार परिषदेत सांगितले.

तुपकर म्हणाले, की राज्यातील शेतकरी एकटे पडले आहेत. अनेक शेतकरी आत्महत्येच्या दारात उभे असताना राज्यकर्ते मात्र सत्तेत मश्गूल आहेत. गावगाड्यातील खचलेल्या शेतकऱ्यांना लढण्यासाठी प्रवृत्त करणार आहोत. तरुणांतून नेतृत्व घडविणार आहोत. शेतकऱ्यांचे प्रश्नी मार्गी लावण्यासाठी क्रांतिसिंह नाना पाटील यांनी स्थापन केलेल्या प्रतिसरकार प्रमाणे गावागावांतून किसान आर्मी स्थापन करण्यात येत आहेत.

माॅन्सूनपूर्व पावसामुळे राज्यात केळी, आंबा आदी पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. परंतु अद्याप पंचनामे केले नाहीत. पंचनामे करून शेतकऱ्यांना तत्काळ मदत द्यावी. सोयाबीन व कापूस शेतीमालासाठी भावांतर अंतर्गत प्रतिक्विंटल ३ हजार रुपये फरकाची रक्कम द्यावी. एफआरपीनुसार ऊस देयक अदा न करणाऱ्या कारखान्यांना गाळप परवाने देऊ नयेत. वन्यप्राण्यांपासून पिकांचे संरक्षण करण्यासाठी शेतीला कुंपण करण्यासाठी मदत द्यावी.

तुपकर यांनी केलेल्या मागण्या

सोयाबीन, कापूस शेतीमालास भावांतर योजना लागू करावी

शेतमजुरांसाठी महामंडळ स्थापन करावे.

पीकविमा कंपन्यांचे लेखा परीक्षण करण्याची गरज.

एफआरपी न करणाऱ्या कारखान्यांना गाळप परवाने देऊ नयेत.

सरकारने शेतकऱ्यांना कर्जमुक्त करावे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Harbhara Tur Kharedi: हरभरा-तूर खरेदीला मुदतवाढ; मेअखेरपर्यंत दिलासा

Jintur Water Shortage: जिंतूर तालुक्यातील ३ गावांना ५ टँकरद्वारे पाणीपुरवठा

Yeola Acid Attack Case: ‘पोलिस मित्र’च निघाला शेतकऱ्यावरील अ‍ॅसिड हल्ल्याचा सूत्रधार

Parbhani Crop Insurance: परभणी जिल्ह्यातील शेतकऱ्यांना संपूर्ण विमा परतावा द्या: कृषिमंत्री भरणे

Sustainable Farming: शेतकऱ्यांनी शाश्वत शेती पद्धतींचा अवलंब करावा

SCROLL FOR NEXT