Gokul Milk Union Meeting Agrowon
ॲग्रो विशेष

Gokul Dudh Sangh Sabha : प्रचंड गदारोळात गोकुळ दूध संघाची सभा गुंडाळली, हित बाजूलाच

Annual Meeting of Goku Milk : प्रचंड घोषणाबाजी आणि हुर्रेबाजीमध्ये गोकुळची आज (30ऑगस्ट) वार्षिक सर्वसाधारण सभा अवघ्या एका तासामध्ये संपन्न झाली.

sandeep Shirguppe

Kolhapur News : प्रचंड घोषणाबाजी आणि हुर्रेबाजीमध्ये गोकुळची आज (30ऑगस्ट) वार्षिक सर्वसाधारण सभा अवघ्या एका तासामध्ये संपन्न झाली. सत्ताधारी गटाकडून सभासदांकडून उपस्थित करण्यात आलेल्या सर्व प्रश्नांची उत्तरे देण्यात आल्याचा दावा करण्यात आला, तर विरोधकांकडून ठरावधारकांना मत मांडू दिले गेले नाही, असा आरोप गोकुळ संचालिका शैमिका महाडिक यांनी केला.

संघाच्या पशू वैद्यकीय सेवेचा बोजवारा उडालेला असताना पशू वैद्यकीय महाविद्यायाचा घाट कशासाठी असा सवाल उपस्थित करण्यात आला. तसेच मागील 4 वर्षात गोकुळच्या ठेवीत घट कशी झाली असा सवाल महाडिक यांनी उपस्थित केला.

यावर गोकुळ अध्यक्ष अरुण डोंगळे म्हणाले की, सभासदांनी बोलायचं असताना आवाज दाबण्याचा प्रश्नच येत नाही.  बोर्ड मिटींगला सातत्याने त्या गैरहजर असतात, आमच्याकडे नोंद असल्याचे अरुण डोंगळे म्हणाले. 

शौमिका महाडिक सभास्थळी जात असताना कार्यकर्त्यांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती यावेळी कार्यकर्त्यांनी झेंडे हातात जोरदार घोषणाबाजी केली यादरम्यान पोलिसांनी त्यांना रोखण्याचा प्रयत्न केला यामध्ये पोलीस आणि कार्यकर्ते यांच्यात जोरदार झटापट झाली तर काही कार्यकर्त्यांनी महिला पोलिसांना धक्काबुक्की केल्याची घटना घडली.

सभेचे कामकाज बरोबर एक वाजता सुरू झाले यावेळी विरोधकांनी आमचा आवाज दाबण्याचा प्रयत्न करत असल्याची जोरदार घोषणा केली.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Soybean Re-Sowing: दुबार पेरणीसाठी सरकार शेतकऱ्यांना मदत करणार, राज्य सरकारचा निर्णय, मंत्री बावनकुळेंची माहिती

Pandharpur Cycle Wari: पंढरपुरात रंगली ४ हजार सायकलस्वारांची आगळीवेगळी ‘सायकल वारी’

Kharif Sowing Delayed: पावसाच्या खंडामुळे खरिपाच्या पेरण्यांना ‘ब्रेक’

Farm Loan Waiver Scheme: लाखभर शेतकऱ्यांचा कोरा होणार ७/१२

Re Sowing Kharif: दुबार पेरणी करताना कोणती काळजी घ्यावी?

SCROLL FOR NEXT