Canal Lining  Agrowon
ॲग्रो विशेष

Canal Lining : ‘कालव्याच्या अस्तरीकरणामुळे शेतीचे अर्थकारण समृद्ध होणार’

Agriculture Economy : अस्तरीकरणाअभावी गेली अनेक वर्षे शेती नापीक होऊन शेतकऱ्यांना आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत होता; पण आता अस्तरीकरणामुळे पाणी उपलब्ध होणार आहे.

Team Agrowon

Kolhapur News : कूर दूधगंगा उजव्या कालव्याच्या १७ कि.मी. अस्तरीकरण कामास २४ कोटी रुपयांचा निधी विशेष बाब म्हणून उपलब्ध झाल्यामुळे मुदाळ ते मिणचे खुर्द या परिसरातील दहा गावांमधील शेतकऱ्यांच्या जीवनात नंदनवन फुलणार आहे व शेतीचे अर्थकारण समृद्ध होणार असल्याचे प्रतिपादन आमदार प्रकाश आबिटकर यांनी केले.

निळपण (ता. भुदरगड) येथे मुदाळ ते मिणचे कालव्याच्या अस्तरीकरण कामाच्या प्रारंभप्रसंगी ते बोलत होते. या वेळी दहा गावांतील शेतकऱ्यांनी निधी उपलब्ध केल्याबद्दल आमदार आबिटकर यांचा सत्कार केला.

आमदार आबिटकर म्हणाले, ‘‘अस्तरीकरणाअभावी गेली अनेक वर्षे शेती नापीक होऊन शेतकऱ्यांना आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत होता; पण आता अस्तरीकरणामुळे पाणी उपलब्ध होणार आहे. या निमित्ताने शेतकऱ्यांच्या जीवनात हरितक्रांती फुलेल.’’

बाजार समितीचे माजी संचालक कल्याणराव निकम म्हणाले, ‘‘गेली अनेक वर्षे अस्तरीकरण नसल्यामुळे पाणी वाया जात होते. त्यामुळे शेतकऱ्यांत वाद होत होते. आता या कामामुळे शेतकऱ्यांना मुबलक पाणी उपलब्ध होणार आहे.’’

विक्रमसिंह पाटील यांनी स्वागत केले. या वेळी बी. एस. देसाई, ‘गोकुळ’चे संचालक नंदकुमार ढेंगे, कल्याणराव निकम, अजित देसाई, कार्यकारी अभियंता ए. एस. पोवार, अशोक भांदिगरे, सुरेश देसाई, प्रवीण नलवडे, वसंत प्रभावळे, संदीप पाटील, शहाजी ढेरे, धनाजी पाटील, उल्हास अगस, सरपंच वैशाली पाटील आदी उपस्थित होते. अक्का नलवडे यांनी आभार मानले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Monsoon 2026 In Kerala : मॉन्सूनचं २६ मे रोजी केरळात होणार आगमन; हवामानशास्त्र विभागाचा अंदाज

Monsoon Arrival 2026: माॅन्सूनच्या वाटचालीसाठी पोषक हवामान; मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्रात ५ दिवस पावसाची शक्यता

MSP Hike 2026: शेतीमालांच्या हमीभावाची वाढ अत्यंत तोकडी

Khat Dukan Karvai: : कृषी विभागाकडून १९ निविष्ठा केंद्रांवर सिंधुदुर्गात कारवाई

Onion Procurement: केंद्राकडून राज्यात १२ रुपये ३५ पैशानं कांद्याची खरेदी सुरु, मुख्यमंत्री फडणवीस यांची माहिती

SCROLL FOR NEXT