Leopard Attack Agrowon
ॲग्रो विशेष

Leopard Protection : म्हसदी परिसरात बिबट्यांच्या संरक्षणाचा मुद्दा ऐरणीवर

Team Agrowon

Dhule Bibtya News : म्हसदी- धमनार रस्त्यावर एका अज्ञात वाहनाच्या धडकेत भक्ष्याच्या शोधार्थ फिरणाऱ्या बिबट्याचा बळी गेला. राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरणाने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार बिबट्यांची संख्या बऱ्यापैकी असल्याचे सांगितले जात आहे.

त्यात राखीव जंगलाच्या बाहेरील बिबट्यांचा समावेश नसला, तरी नैसर्गिक, रस्ते अपघात, विहिरीत पडून, शिकार, विषबाधा, विजेच्या प्रवाहासह अन्य कारणांमुळे बिबट्यांचा मृत्यू होण्याची बाब चिंता वाढविणारी आहे. त्यात म्हसदी- धमनार रस्त्यावरील अपघातामुळे बिबट्यांच्या संरक्षणाचा प्रश्‍न ऐरणीवर आला आहे.

विविध रस्त्यांवरील अपघातांत बिबट्यांचा मृत्यू होण्याच्या घटना वारंवार घडतात. यामुळे वन्यप्रेमी आणि वनाधिकाऱ्यांची चिंता वाढू लागली आहे. हे थांबविण्यासाठी बिबट्यांच्या भ्रमणमार्गावर उपशमन उपाययोजना करण्यावर भर देणे आवश्यक आहे.

दुसरीकडे बिबट्याचे आवडते खाद्य असलेल्या कुत्र्यांचा वावर अधिकाधिक गावांजवळ असतो. तथापि, वेळेत कुत्रा न आढळल्यास हे बिबट लहान पाळीव प्राण्यांची शिकार करत असल्याचे वनविभागाचे अनुभवी कर्मचारी सांगतात.

अधिवासही सध्या संकटात

वनक्षेत्राची ‘शान’ असलेल्या बिबट्यांची संख्या वाढावी म्हणून शासनाच्या वनविभागातर्फे शर्थीचे प्रयत्न केले जात आहेत. साक्री तालुक्यात म्हसदी ते शेंदवड मांजरीपर्यंत सुरक्षित वनक्षेत्र असल्याने बिबट्यांचा मुक्त संचार आहे. गेल्या दोन वर्षांपासून दमदार पावसामुळे वनक्षेत्रात ऐन उन्हाळ्यातही ठराविक ठिकाणी पाणवठ्यात पाणी उपलब्ध असे.

यंदा तापमानाने चाळिशी पार केल्याने वनक्षेत्रातील पाणवठे कोरडेठाक झाल्याने वन्यपशूंची भटकंतीही वाढली आहे. बिबट्यांचा नैसर्गिक स्वभाव, वर्तणूक, बदलणाऱ्या परिस्थितीनुसार जुळवून घेण्याची क्षमता व मोठ्या प्रमाणातील प्रजोत्पादनामुळे बिबट्यांची संख्या वाढत असल्याची माहिती वनविभागाच्या सूत्रांनी दिली.

वनक्षेत्रात बिबट्याचे खाद्य असलेले तृणभक्षी प्राणी कसे वाढतील, यासाठी वनविभागातर्फे प्रयत्न केले जातील. शिवाय वनक्षेत्रात इतर वृक्षांसह तृण, गवत वाढीसाठी प्रयत्न होतील. ठराविक ठिकाणी पाणवठे तयार करत बिबट्यांची भटकंती थांबविली जाईल.
डी. आर. अडकिने, वनक्षेत्रपाल, पिंपळनेर वनविभाग, जि.धुळे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Crop Damage Compensation : लातूर जिल्ह्याला अतिवृष्टीची भरपाई मंजूर

Buffalo Conservation : वारणाच्या जातिवंत म्हैस संवर्धन, पैदास योजनेतून म्हशी वितरणास प्रारंभ

Cotton Crop Damage : अतिपावसाने कापसाला कोंब

Crop Insurance : विमा कंपनीला पीक नुकसानीच्या सव्वा लाख पूर्वसूचना

Crop Loan : खानदेशात पीककर्ज वितरणात राष्ट्रीय बँका मागे

SCROLL FOR NEXT