Sindhudurg Rains  Agrowon
ॲग्रो विशेष

Sindhudurg Rain: सिंधुदुर्ग जिल्ह्यात पावसाचा जोर ओसरला

Konkan Weather: जिल्ह्यात गेल्या तीन दिवसांपासून सुरू असलेल्या पावसाचा जोर सोमवारी (ता.१६) कमी झाला आहे. अधूनमधून पावसाच्या जोरदार सरी पडत आहेत परंतु त्यानंतर उघडीप देखील मिळत आहे.

Team Agrowon

Sindhudurg News: जिल्ह्यात गेल्या तीन दिवसांपासून सुरू असलेल्या पावसाचा जोर सोमवारी (ता.१६) कमी झाला आहे. अधूनमधून पावसाच्या जोरदार सरी पडत आहेत परंतु त्यानंतर उघडीप देखील मिळत आहे.पावसाचा जोर कमी झाल्याने पुराचा धोका टळला आहे.विस्कळित झालेली अनेक मार्गावरील वाहतूक सुरळीत झाली आहे.

जिल्ह्यात गेल्या तीन-चार दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरू होता. मात्र रविवारी मध्यरात्रीपासून सिंधुदुर्ग जिल्ह्याला मुसळधार पावसाने झोडपून काढले. त्यामुळे सोमवारी सकाळपासून जिल्ह्यात पूरसदृश स्थिती निर्माण झाली. अनेक मार्ग पाण्याखाली गेल्यामुळे वाहतुकीवर परिणाम झाला.

दुपारी एक वाजेपर्यंत जिल्ह्यात मुसळधार पाऊस सुरू होता. नद्यांच्या पाणीपातळीत प्रचंड वाढ झाली होती. काही नद्या इशारा पातळीजवळ पोहोचल्या होत्या.मात्र एक वाजल्यानंतर पावसाचा जोर काहीसा कमी होण्यास सुरुवात झाली. मंगळवारी सकाळपासून पावसाने उघडीप दिली आहे.

अधूनमधून जोरदार सरी पडत असल्या तरी उघडीप देखील मिळत आहे. त्यामुळे पुराचा धोका टळला आहे. अनेक मार्गांवरील पाणी कमी झाल्यामुळे वाहतूक सुरळीत सुरू झाली आहे. विस्कळित झालेले जनजीवन पूर्वपदावर येत असल्याचे चित्र आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Ladki Bahin Yojana e-KYC: ९२ लाख लाडक्या बहिणींना धक्का, 'कॅग'चेही ताशेरे, आदिती तटकरे काय म्हणाल्या?

Ashadhi Wari 2026: माउलींच्या पहिल्या गोल रिंगणाची जय्यत तयारी

Kharif Sowing: लातुरात खरिपाच्या ४० टक्केच पेरण्या; मांजरा धरणात १७.५१ टक्के उपयुक्त पाणीसाठा

Irrigation Survey Funding Demand: रिटेवाडी उपसा सिंचनच्या सर्वेक्षणाला निधीची मागणी

Fertilizer Sale Irregularities: मेळघाटात कृषी निविष्ठांच्या विक्रीत अनियमितता

SCROLL FOR NEXT