Peanut, Soybean, Moong and Urad at MSP Agrowon
ॲग्रो विशेष

Peanut, Soybean, Moong and Urad at MSP : गुजरात सरकार हमीभावावर भुईमूगसोबतच सोयाबीन, मूग आणि उडीदची खरेदी करणार

Gujarat Agriculture Minister Raghavji Patel : गुजरात सरकार ११ नोव्हेंबरपासून भुईमूगसोबतच सोयाबीन, मूग आणि उडीदची खरेदी करणार आहे. यासाठी नोंदणी ३ ऑक्टोबर ते ३१ ऑक्टोबर २०२४ पर्यंत करता येणार आहे.

Aslam Abdul Shanedivan

Pune News : गुजरात सरकार भुईमूगसह सोयाबीन, मूग आणि उडीदची खरेदी हमीभाववर करणार असल्याची माहिती राज्याचे कृषिमंत्री राघवजी पटेल यांनी दिली आहे. तसेच सरकार या पिकांची खरेदी ११ नोव्हेंबरपासून करणार असून नोंदणी गुरूवार पासून (ता. ३) सुरू होईल, असा दावा कृषिमंत्री पटेल यांनी केला आहे.

गुजरात सरकारने हमीभाववर भुईमूग आणि कडधान्ये खरेदी करण्यासाठी १६० हून अधिक केंद्रांची निवड केली आहे. नोंदणी ३ ऑक्टोबर ते ३१ ऑक्टोबर २०२४ पर्यंत राज्यातील शेतकऱ्यांना नोंदणी करता येणार आहे. यासाठी शेतकऱ्यांनी ई-समृद्धी पोर्टलवर ऑनलाईन नोंदणी करावी, असे आवाहन कृषिमंत्री पटेल यांनी केलं आहे.

तसेच राज्य सरकारने भुईमूग आणि कडधान्ये हमीभाववर खरेदी करण्यासाठी ९० दिवसांचा कालावधी निश्चित केली आहे. तर खरेदी ११ नोव्हेंबरपासून केली जाईल. ही खरेदी पंतप्रधान अन्नदाता आय संरक्षण मोहिमेअंतर्गत केली जाईल. यामुळे राज्यातील शेतकऱ्यांनी या संधीचा लाभ घेऊन अधिका अधिक नोंदणी करावी, असे आवाहन कृषिमंत्री पटेल यांनी केले आहे.

यंदाचा हमीभाव दर?

२०२४-२५ च्या खरीप हंगामासाठी, भुईमुगाला हमीभाव ६,७८३ रूपये प्रति क्विंटल निश्चित करण्यात आला आहे. तर सोयाबीनला ४, ८९२ रुपये प्रति क्विंटल हमीभाव देण्यात आला आहे. उडीद आणि मूगासाठी अनुक्रमे ७,४०० आणि ८,८६२ रूपये हमीभाव निश्चित करण्यात आला आहे.

गेल्या वर्षी किती खरेदी?

गेल्या वर्षी मूल्य समर्थन योजनेंतर्गत (पीएसएस) शेतकऱ्यांकडून हमीभावावर पिकांची खरेदी केली होती. ज्यामध्ये ६१ हजार ३७२ शेतकऱ्यांकडून ६७१ कोटी रुपयांचे १.१८ लाख मेट्रिक टनांहून अधिक उत्पादन खरेदी केले होते.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Shaktipeeth Highway Protest : जमीन द्यायची नाही अन् काही ऐकायचं नाही

Bogus Crop Insurance : बोगस पीकविमा काढल्यास आधार काळ्या यादीत

Paddy Plantation : रत्नागिरी जिल्ह्यात १५ हजार हेक्टर क्षेत्रावर भात लागवड

Solapur Rainfall : बळिराजानं पेरलं, पावसानं वाऱ्यावर सोडलं

Sugarcane Crushing : एक लाख हेक्टरवरील उसाचे होणार गाळप

SCROLL FOR NEXT