Sugarcane  Agrowon
ॲग्रो विशेष

Sugarcane Farming : शाहूवाडी परिसरात खुंटली आडसाली उसाची वाढ

Sugarcane Cultivation : शाहूवाडी परिसरात आडसाली उसाची वाढ खुंटली आहे. परिसरात शेतकऱ्यांनी जुलैदरम्यान आडसाली ऊस लागण केली आहे.

Team Agrowon

Kolhapur News : शाहूवाडी परिसरात आडसाली उसाची वाढ खुंटली आहे. परिसरात शेतकऱ्यांनी जुलैदरम्यान आडसाली ऊस लागण केली आहे. काही शेतकऱ्यांनी कांडी लागण, तर काहींनी उसाची रोपे लागण अशा पद्धतीने आडसाली उसाच्या लागणी झाल्या आहेत.

मात्र जूनपासून पाच महिने झाले, पावसाचा सूरसपाटा सुरूच आहे. सततच्या पावसाने काही भागातील उसाची वाढ झालेली नाही. बांबवडे व परिसरात नगदी पीक म्हणून शेतकऱ्यांचा उसाकडे वाढता कल आहे.

येथील शेतीला ठिबक सिंचन योजना व आरफळ कालव्याचे मुबलक असे पाणी असल्यामुळे ऊस लागणीकडे शेतकऱ्यांचा वाढता कल आहे. आडसाली ऊस लागण केल्यास भरघोस उत्पन्न मिळत आहे.

या अनुषंगाने शेतकरी जुलैदरम्यान ऊस लागणी करतात. सततच्या पावसाने या वर्षी लागणीपासून ऊस ‘जैसे थे’ आहे. वारंवार रासायनिक खताची मात्रा देऊनसुद्धा उसाची वाढ झाली नाही. नुकसानीचा शेतकऱ्याला सामना करावा लागत आहे.

नोव्हेंबरदरम्यान, ऊस लागणी केल्यास ४० ते ५० टन एकरी एवढेच उसाचे उत्पन्न मिळत असते. आडसाली ऊस लावण केल्यास एकरी ८० ते ९० टन ऊस उत्पन्न मिळते. मात्र सततच्या पावसामुळे बळिराजा अडचणीत आला आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Orchard Water Management: पाण्याच्या उपलब्धतेनुसार अतिघन बागेचे नियोजन

Soybean Crop Management: सोयाबीनमधील फुलगळीची कारणे जाणून उपाययोजना आवश्‍यक

Maharashtra Drought: दुष्काळ जाहीर होणार, सहकारमंत्री बाबासाहेब पाटील यांची माहिती

Indian Oil Trade: कच्च्या तेलाची आयात; पॅकबंद तेलाची निर्यात

India US Trade: अमेरिकेपुढे झुकण्याची घोडचूक नको

SCROLL FOR NEXT