Ground Water Level Agrowon
ॲग्रो विशेष

Ground Water Level : परभणी जिल्ह्यातील भूजल पातळीत खालावली

भूजल सर्वेक्षण व विकास यंत्रणा यांच्याकडून घेण्यात आलेल्या निरीक्षण विहिरीतील नोंदीवरून हे स्पष्ट झाले आहे.

Team Agrowon

Parbhani News : परभणी जिल्ह्यात यंदाच्या (२०२३) जानेवारी महिन्यातील भूजल पातळी गेल्या पाच वर्षातील जानेवारी महिन्यातील सरासरी पातळीच्या तुलनेत ०.३१ ते २.३५ मीटरने खोल गेली आहे.

भूजल सर्वेक्षण व विकास यंत्रणा यांच्याकडून घेण्यात आलेल्या निरीक्षण विहिरीतील नोंदीवरून हे स्पष्ट झाले आहे. येत्या काळात भूजल पातळी खोल गेलेल्या गावात पाणी टंचाईची समस्या उद्भवू शकते.

भूजल सर्वेक्षण व विकास यंत्रणेच्या वरिष्ठ भूवैज्ञानिक कार्यालयामार्फत जिल्ह्यातील सर्व नऊ तालुक्यांतील ८६ निरीक्षण विहिरींच्या माध्यमातून भूजल पातळीच्या नोंदी घेतल्या जातात.

त्यात परभणी तालुक्यातील १४ निरीक्षण विहिरी, जिंतूर तालुक्यातील २०, सेलू तालुक्यातील १२, मानवत तालुक्यातील ४, पाथरी तालुक्यातील ८, सोनपेठ तालुक्यातील ५, गंगाखेड तालुक्यातील ९, पालम तालुक्यातील ७, पूर्णा तालुक्यातील ८ निरीक्षण विहिरींचा समावेश आहे.

यंदाच्या जानेवारी महिन्यात घेण्यात आलेल्या नोंदीनुसार २०१८ ते २०२२ या पाच वर्षातील सरासरी भूजल पातळीच्या तुलनेत ०.३१ ते २.३५ मीटरने घट झाली असल्याचे आढळून आले आहे.

यंदाच्या जानेवारी महिन्यात सोनपेठ तालुक्यातील सर्वाधिक म्हणजे ५.२६ मीटर एवढी खोल तर पाथरी तालुक्यातील भूजल पातळी सर्वात वर म्हणजे ३.०६ मीटर असल्याचे आढळून आले आहे. परभणी जिल्ह्यात सिंचन विहीर, पाणीपुरवठा योजनांच्या विहिरी, विंधन विहिरीच्या संख्येत वाढ झाली आहे.

त्याद्वारे बेसुमार उपसा सुरु आहे. परिणामी भूजल पातळी खोल जात असल्याचे आढळून आले आहे. बेसुमार उपसा न थांबविल्यास तसेच पाण्याचा काटेकोर वापर न केल्यास येत्या उन्हाळ्यात अनेक गावात पाणी टंचाई उद्भवू शकते, असे सूत्रांनी सांगितले.

जानेवारी महिना तुलनात्मक भूजल पातळी स्थिती (मीटरमध्ये)

तालुका - २०२२ - २०२३

परभणी- ४.१६ - ५.१०

जिंतूर - ४.१४ - ४.३३

सेलू ५.३८- ४.७९

मानवत- ३.४५ - ३.२८

पाथरी - ४.५९- ४.०६

सोनपेठ - ४.८२ - ५.२६

गंगाखेड- ५.९९- ४.६७

पालम - ३.८६- ४.४१

पूर्णा - ३.२९- ३.०६

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Pune Rainfall: पुणे जिल्ह्यात पावसाचा जोर ओसरला

MKCL Investment: ‘एमकेसीएल’ने सरकारमध्ये गुंतवणूक करावी; शरद पवार यांची अपेक्षा

Market License Cancellation: पणन संचालकांचा खासगी बाजारांवर कारवाईचा धडाका; ‘रामेश्वर, ‘कसमादे’, ‘जय गजानन’ बाजारांचे परवाने रद्द

Indigenous Livestock Breeds: सोळा नव्या देशी पशुजातींना मान्यता

Agro-Service Federation's Protest: प्रस्तावित आकृतिबंधाविरोधात कृषी सेवा महासंघाचे आंदोलन

SCROLL FOR NEXT