Export Non Basmati rice Agrowon
ॲग्रो विशेष

Export Non Basmati rice : बिगर-बासमती पांढरा तांदळाच्या निर्यातीला परवानगी; अधिसूचना जारी

Non-basmati White Rice Exports : केंद्र सरकारच्या विदेश व्यापार महासंचालनालयाने मलावी आणि झिम्बाब्वे या दोन आफ्रिकन देशांना गैर-बासमती पांढरा तांदूळ निर्यात करण्यास परवानगी दिली आहे.

Aslam Abdul Shanedivan

Pune News : केंद्र सरकारने २००० मेट्रिक टन बिगर बासमती पांढरा तांदूळ निर्यात करण्याचा निर्णय घेतला आहे. सरकारच्या विदेश व्यापार महासंचालनालयाने (DGFT) बुधवारी (ता.१९) याबाबत अधिसूचना जारी केली. या अधिसुचनेनुसार मलावी आणि झिम्बाब्वे या दोन आफ्रिकन देशांना गैर-बासमती पांढरा तांदूळ निर्यात करण्यास परवानगी दिली आहे. तर ही निर्यात नॅशनल कोऑपरेटिव्ह एक्सपोर्ट लिमिटेड (एनसीईएल) मार्फत केली जाईल असेही डीजीएफटीने आपल्या अधिसूचनेत म्हटले आहे. 

मलावी हा दक्षिण-पूर्व आफ्रिकेतील तर झिम्बाब्वे हा दक्षिण आफ्रिकेतील राष्ट्र आहे. अधिसूचनेनुसार, प्रत्येक देशाला १००० टन गैर-बासमती तांदळाच्या निर्यातीला सरकारकडून परवानगी देण्यात आली आहे.

देशांतर्गत पुरवठ्याला चालना देण्यासाठी २० जुलै २०२३ पासून गैर-बासमती पांढऱ्या तांदळाच्या निर्यातीवर केंद्र सरकारने बंदी घातली होती. मात्र काही देशांच्या अन्न सुरक्षेच्या गरजा पूर्ण करण्यासाठी सरकारने आपल्या धोरणात काही बदल केले. तर अशा देशांच्या विनंतीनुसार गैर-बासमती पांढऱ्या तांदळाच्या निर्यातीस परवानगी दिली आहे. 

त्याप्रमाणे भारताने याआधी टांझानिया, जिबूती आणि गिनी-बिसाऊसह काही आफ्रिकन देशांमध्ये गैर-बासमती तांदूळ निर्यात करण्यास परवानगी दिली होती. याशिवाय नेपाळ, कॅमेरून, कोटे डी आयव्हरी, गिनी, मलेशिया, फिलीपिन्स आणि सेशेल्स सारख्या देशांना देखील गैर-बासमती पांढऱ्या तांदळाच्या निर्यात करण्यात आली आहे. 

दरम्यान मार्च २०२४ मध्ये केंद्र सरकारने ८० हजार टन बिगर बासमती तुकडा तांदूळ निर्यात करण्यास परवानगी दिली होती. यात टांझानियाला ३० हजार टन बिगर बासमती पांढरा तांदूळ, तसेच जिबूती आणि गिनी बिसाऊला यांना ८० हजार टन तुकडा तांदूळ निर्यात करण्यास परवानगी दिली होती.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Sugar Price: साखरेचा किरकोळ दर सलग चौथ्या दिवशी ६० रुपयांच्या खाली, सणासुदीतील मागणीमुळे दरवाढीचा कल

Drought 2026 : राज्य सरकार किती तालुक्यात दुष्काळ जाहीर करू शकतं?

Wildlife Damage: वन्यप्राण्यांपासून पिकांचे नुकसान थांबवा : पालकमंत्री अ‍ॅड. यशोमती ठाकूर

Rain Dry Spell: पावसाची दडी, खरीप संकटात; भरघोस मदतीची मागणी

Maharashtra Drought: महाराष्ट्रात दुष्काळ; शेतकऱ्यांना सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्या- हर्षवर्धन सपकाळ

SCROLL FOR NEXT