Agriculture University Agrowon
ॲग्रो विशेष

Agriculture News : कृषी विद्यापीठ, शेतकरी यांच्यातील अंतर वाढू लागले

Relation of Agriculture and Farmers : ‘‘कृषी विद्यापीठाचे तंत्रज्ञान शेतकऱ्यांपर्यंत पोचविण्याचा अभाव कमी व्हायला पाहिजे. कृषी विद्यापीठ व शेतकरी यांच्यातील अंतर वाढू लागले आहे. ते तपासून पाहण्याची गरज आहे,’’ असे प्रतिपादन कृषिरत्न विजयअण्णा बोराडे यांनी केले.

Team Agrowon

Parbhani News : ‘‘कृषी विद्यापीठाचे तंत्रज्ञान शेतकऱ्यांपर्यंत पोचविण्याचा अभाव कमी व्हायला पाहिजे. कृषी विद्यापीठ व शेतकरी यांच्यातील अंतर वाढू लागले आहे. ते तपासून पाहण्याची गरज आहे,’’ असे प्रतिपादन कृषिरत्न विजयअण्णा बोराडे यांनी केले.

('ॲग्रोवन'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाचे निवृत्त विस्तार शिक्षण संचालक कृषिभूषण डॉ. उत्तमराव इंगळे यांच्या ‘देह वेचावा कारणी’ व ‘कृषिवंत’ या पुस्तकांचे प्रकाशन माजी राज्यमंत्री डॉ. माधवराव किन्हाळकर यांच्या हस्ते सोमवारी (ता.३०) कृषी महाविद्यालयाच्या सभागृहामध्ये झाले. या वेळी डॉ. इंगळे, माजी कुलगुरू डॉ.अशोक ढवण, माजी खासदार गणेशराव दुधगावकर, सनदी अधिकारी सुरेश काकाणी, सुभाष लाखे, के. एम. नागरगोजे, डॉ. व्हि. एम. पवार, शिक्षण संचालक डॉ. उदय खोडके आदींची प्रमुख उपस्थिती होती.

बोराडे म्हणाले, ‘‘डॉ. उत्तमराव इंगळे यांनी विस्तार कार्याच्या माध्यमातून शेतकऱ्यांना विद्यापीठाच्या सान्निध्यात आणले. विद्यापीठाबद्दल गोडी निर्माण केली. शास्त्र व विज्ञानाची कास धरुन कार्य केले. लोकसंख्या वाढली आहे.

त्यामुळे विस्तार कार्य देखील वाढविण्याची गरज आहे. कृषी महाविद्यालयांची संख्या वाढत आहे. शिक्षणचा दर्जा टिकवावा लागेल. ज्ञान खर्चिक झाले आहे. बहुजन समाज शिक्षणाबाहेर फेकणारी शैक्षणिक व्यवस्था पुढे येऊ लागली आहे.’’

डॉ. किन्हाळकर म्हणाले,‘‘डॉ. इंगळे यांनी शेतकऱ्यांशी एकात्म होऊन कृषी तंत्रज्ञानाचा प्रसार केला.’’

डॉ. इंगळे म्हणाले, ‘‘परभणी कृषी विद्यापीठात अन्नतंत्र महाविद्यालय स्थापन करण्यासाठी डॉ. एम. एस. स्वामिनाथन यांनी खूप मदत केली. तत्कालीन कुलगुरूंनी कृषी विस्तार कार्याची जबाबदारी सोपवली. मराठवाड्यातील प्रत्येक गावातील शेतकऱ्यांपर्यंत कृषी विद्यापीठाचे तंत्रज्ञान पोचविण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले.’’

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Sangola Water Crisis: सांगोल्यातील बंधारे कोरडे; जलसंकट वाढले

Farmer Compensation: बाधित शेतकऱ्यांच्या मोबदल्यासाठी खलबते

Fruit Drop Subsidy Issue: संत्रा, मोसंबी, फळगळ अनुदानामध्ये गोंधळ

Fund Delay: स्थगितीला वाव देण्यासाठी निधी वर्ग करण्यास उशीर?

Maharajasva Campaign: महाराजस्व अभियान यशस्वी करण्यासाठी समन्वयाने काम करा: जिल्हाधिकारी आशिमा मित्तल

SCROLL FOR NEXT