PDKV Agrowon
ॲग्रो विशेष

PDKV Shiwarferi : शिवारफेरीत गर्दीने प्रक्षेत्र फुलले

Agriculture University : डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठात शुक्रवार (ता.२०)पासून सुरू असलेल्या शिवारफेरीला यंदा मोठा प्रतिसाद मिळतो आहे.

Team Agrowon

Akola News : डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठात शुक्रवार (ता.२०)पासून सुरू असलेल्या शिवारफेरीला यंदा मोठा प्रतिसाद मिळतो आहे. पहिल्या दोन दिवसांत हजारो शेतकऱ्यांनी भेटी देत तंत्रज्ञान, पीकवाणांची माहिती घेतली. रविवारी (ता. २२) या शिवारफेरीचा पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या उपस्थितीत समारोप नियोजित करण्यात आला आहे.

डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ स्थापना दिनानिमित्त ही शिवारफेरी आयोजित करण्यात आली आहे. यंदा विद्यापीठाच्या प्रवेशद्वाराजवळ गहू संशोधन केंद्राच्या प्रक्षेत्रावर विविध पीकवाणांचे डेमो प्लॉट उभारण्यात आले आहेत. शिवाय विद्यापीठात प्रत्येक विभागातही त्यांच्या तंत्रज्ञानाचे प्रदर्शन करण्यात आले आहे. ही शिवार फेरी पाहण्यासाठी विदर्भासह मराठवाड्याच्या काही जिल्ह्यांतून शेतकरी भेटी देत आहेत. पहिल्या दोन दिवसांत हजारो शेतकरी शिवारफेरीत सहभागी झाले. कृषी विभागाने शेतकरी गट, महिला गटांच्या भेटीचे नियोजन केल्याने ही गर्दी आणखी वाढली आहे.

विद्यापीठाने शेतकऱ्यांना पाहण्यासाठी एकाच ठिकाणी खरीप पिकांचे विविध जातीचे पीक प्रात्यक्षिक तयार केले. तेलबिया, कडधान्य, तृणधान्य, कापूस, चारापिके, भाजीपाला पिके व फुलांच्या विविध जाती येथे लावण्यात आल्या आहेत. विद्यापीठाच्या महत्त्वाच्या १२ शिफारशींचे प्रात्यक्षिकही आहे. प्रत्येक ठिकाणी संबंधित पिकांचे तज्ज्ञ उपस्थित असून ते शेतकऱ्यांच्या शंकांचे समाधान करीत आहेत. संबंधित पिकवाणाची वैशिष्ट्ये, लागवड तंत्र, व्यवस्थापन अशा अंगाने शेतकरी माहिती घेताना दिसून आले. प्रामुख्याने विदर्भातील प्रमुख पिके असलेल्या कपाशी, सोयाबीन, तूर या पिकांबाबत शेतकरी अधिक संख्येने नवीन वाणांची माहिती घेत होते. विद्यापीठ संशोधित कपाशी, सोयाबीन वाण, सघन लागवड या ठिकाणी शेतकरी बघत होते.

पाणी फाउंडेशनकडून २६ पिकांवर मार्गदर्शन : आमीर खान

अकोला कुठल्याही क्षेत्रात यश हे खऱ्या ज्ञानामुळे मिळते. आज शेतकरीसुद्धा योग्य ज्ञानाच्या आधारे शेतीत यशस्वी होत आहेत. पाणी फाउंडेशन गेल्या काही वर्षांपासून राज्यात सुरुवातील सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना शिक्षित करण्याचे काम करू लागले. आता २६ पिकांवर शेतकऱ्यांना तज्ज्ञांचे मार्गदर्शन देण्याचे काम होत आहे, असे पाणी फाउंडेशनचे अध्यक्ष तथा सिनेअभिनेता आमीर खान यांनी सांगितले.

आज शेवटचा दिवस

तीनदिवसीय शिवारफेरीचा रविवारी समारोप होणार आहे. त्यामुळे या दिवशी शेतकऱ्यांची मोठी गर्दी होण्याची शक्यता आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Masala Business Success: अस्सल चवीच्या रिठे मसाल्यांनी मिळविली ग्राहकांची पसंती

Collective Farming Model: एकत्र आलो म्हणून पुढे गेलो...

Maharashtra Drought Crisis: होरपळीच्या सुलतानी झळा

Onion Procurement Irregularities: ‘खरे’ उत्तर मिळेल?

Water Shortage Management: पुणे जिल्ह्यात टंचाईमुळे पाणी नियोजनाला वेग

SCROLL FOR NEXT