Cotton Crop Agrowon
ॲग्रो विशेष

Cotton Crop : वैतागलेल्या शेतकऱ्याने उभ्या कापसाच्या पिकालाच लावली आग

Cotton Bollworm : कापसावर बोंड अळी आणि लाल्या रोगाचा प्रादुर्भाव झाला. त्यामुळे वैतागलेल्या शेतकऱ्याने उभ्या पिकाला आग लावली.

Swapnil Shinde

Cotton Pest Control : यंदा पावसाने पाठ फिरवल्याने खरीप हंगाम धोक्यात आला आहे. त्यात कपाशी पिकावर बोंडअळीचा मोठ्या प्रमाणात प्रादूर्भाव आढळून आला आहे. अळीने परिपक्व झालेल्या बोंडावर हल्ला चढवल्याने नुकसान झाले. त्यामुळे जळगाव जिल्ह्यातील शेतकऱ्याने कापसाच्या पिकाला आग लावली.

चोपडा तालुक्यात शेतकरी मोठ्या प्रमाणावर कापूस लागवड करतात. परंतु अनियमित पाऊस आणि कापसावर पडलेली बोंड अळी तसेच लाल्या रोगामुळे कापसाच्या उत्पन्नामध्ये मोठ्या प्रमाणावर घट झाली आहे. ऐन कापणीच्या काळात किडीचा प्रादुर्भाव झाल्याने शेतकऱ्यांनी लागवडीवर केलेला खर्च वजा जाता उत्पन्न शून्य येण्याची भीती आहे. याच धास्तीने शामकांत पाटील या शेतकऱ्यांकडून टोकाचा निर्णय घेतला आहे.

कापसावर बोंड अळीच्या प्रादुर्भावामुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे तातडीने करण्याचे आदेश शासनाने विभागीय पातळीवर दिले आहेत. याप्रकरणी शासनाने सर्व प्रशासकीय विभागांना आदेश जारी केले आहेत. त्यानुसार पंचनामे झाले परंतू अद्याप शेतकऱ्याच्या हातात काहीच भरपाई मिळाली नाही. त्यामुळे शेतकऱ्यांची दिवाळीचा सणही साजरा करता येत नाही. त्यामुळे जळगाव जिल्ह्यात शासनाने तात्काळ दखल घेऊन किडी व रोगबाधित शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळण्यासाठी तालुक्‍यात 100 टक्‍के पीक विमा लागू करावा, अशी मागणी होत आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Students Protest: मांजरीतील आदिवासी विद्यार्थ्यांचे बेमुदत उपोषण; १३व्या दिवशी एका विद्यार्थ्याची प्रकृती बिघडली

Papaya Farming: खानदेशात पपई येतेय काढणीवर

Micro Irrigation: ठिबक अनुदानाबाबत शेतकऱ्यांत संभ्रम

Sugar Prices: साखरेचे दर कमी होतील का? 'इस्मा'नं दिली महत्त्वाची माहिती

Agrowon Podcast: सोयाबीनच्या दरात घसरण, हरभरा दरात घसरण, टोमॅटो दरात चढ-उतार, पालक आवकेत वाढ तर डाळिंबाच्या दरात बदल

SCROLL FOR NEXT