Dr. Indra Mani  Agrowon
ॲग्रो विशेष

Agricultural Research and Advisory Committee : शेतकऱ्यांच्या सहवासाने संशोधनाची दिशा स्पष्ट होते

Dr. Indra Mani : ‘माझा एक दिवस बळीराजासाठी’सारखे विविध उपक्रम व ऑनलाइन पद्धतीने विद्यापीठाचा थेट शेतकऱ्यांशी सहवास, संवाद घडवून आणण्याचा प्रयत्न होतो आहे. या मधून शास्त्रज्ञांच्या संशोधनाची दिशा स्पष्ट होण्यास मदत होते,

Team Agrowon

Chhatrapati Sambhajinagar : ‘माझा एक दिवस बळीराजासाठी’सारखे विविध उपक्रम व ऑनलाइन पद्धतीने विद्यापीठाचा थेट शेतकऱ्यांशी सहवास, संवाद घडवून आणण्याचा प्रयत्न होतो आहे. या मधून शास्त्रज्ञांच्या संशोधनाची दिशा स्पष्ट होण्यास मदत होते, असे मत वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर इंद्र मणी मिश्रा यांनी व्यक्त केले.

रब्बी हंगाम पूर्व विभागीय कृषी संशोधन व सल्लागार समितीची ७६ वी बैठक स्थानिक राष्ट्रीय कृषी संशोधन प्रकल्पाच्या सभागृहात मंगळवारी (ता. २२) पार पडली. या बैठकीच्या उद्‍घाटन सत्रात अध्यक्ष स्थानावरून कुलगुरू डॉ. इंद्र मणी मिश्रा बोलत होते. या बैठकीला महाराष्ट्र कृषी शिक्षण व संशोधन परिषदेचे महासंचालक व प्रभारी कृषी आयुक्त डॉ. रावसाहेब भागडे, संचालक संशोधन डॉ. हरिहर कौसडीकर,

विभागीय कृषी सहसंचालक डॉ. तुकाराम मोटे, लातूर विभागीय कृषी सहसंचालक कार्यालयाचे प्रतिनिधी म्हणून लातूरचे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी आर. टी. जाधव, प्रादेशिक साखर सहसंचालक शरद जरे, वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाचे संचालक संशोधन डॉ. के. एस. बेग, संचालक विस्तार शिक्षण डॉ. डी. व्ही. आसेवार, राष्ट्रीय कृषी संशोधन प्रकल्पाचे सहयोगी संचालक संशोधन डॉ. एस. बी. पवार आदींची प्रामुख्याने उपस्थिती होती.

डॉ. पवार यांनी प्रास्ताविक केले. डॉ. मोटे म्हणाले, की हवामान बदलाचे संकट नवनवीन आव्हाने घेऊन येत आहे. अतिपावसाच्या काळात बेडवर घेतलेली पिके तग धरलेली दिसतात. विद्यापीठाच्या बायोमिक्सची उपलब्धता विविध ठिकाणी कशी करून देता येईल याविषयी पावले उचलायला हवी. याशिवाय व्हीएसआयचे वसंत ऊर्जा टॉनिक मराठवाड्यातील कोणकोणत्या पिकांसाठी लाभकारक ठरू शकते, याविषयीच्या ट्रायल विद्यापीठाने घ्याव्या.

एमसीएआरचे महासंचालक डॉ. भागडे म्हणाले, की पीक उत्पादनाची एक लेवल गाठली गेली आहे. सोयाबीन काढणीचा खर्च वाढला मात्र पर्यायी पीक कोणते हा प्रश्न आहे. मजुरांच्या प्रश्नाने शेती बंद पडू नये यासाठी यांत्रिकीकरणावर विशेष संशोधन व्हावे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Hingoli Crop Loan : हिंगोली जिल्ह्यात पीककर्ज वाटपाचे ३५.१६ टक्के उद्दिष्ट साध्य

Rabi Season : पाच लाख ५४ हजार हेक्टरवर रब्बीत पेरणीचे कृषी विभागाकडून नियोजन

District Co-operative Bank : जिल्हा बँकेवर प्रशासक नियुक्तीच्या हालचाली

Amravati Rain Deficit : अमरावती जिल्ह्यात २२ दिवसांपासून पावसाचा खंड

Crop Damage Panchnama: पिकांवर रोटाव्हेटर फिरवू नका, नुकसानीच्या पंचनाम्यासाठी पुरावे राहतील, सहकारमंत्र्यांचे शेतकऱ्यांना आवाहन

SCROLL FOR NEXT