Marathwada Liberation Day Agrowon
ॲग्रो विशेष

Marathwada Development : मराठवाड्याचा विकास उर्वरित राज्याच्या मानाने कमी ः देशमुख

Marahwada Mukti Sangram : मराठवाड्याबाबत सरकारची असलेली उदासीन भूमिका यावर परखड मत व्यक्त करताना देशमुख म्हणाले, की निजामाच्या जोखडीतून मराठवाडा बिनशर्त महाराष्ट्रात सामील झाला.

Team Agrowon

Beed News : मराठवाड्याचा विकास उर्वरित राज्याच्या मानाने कमी झाला असल्याचे प्रतिपादन छत्रपती संभाजीनगर येथील स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा संशोधन संस्थेचे अध्यक्ष तथा माजी आ.डि.के.देशमुख यांनी मंगळवारी (ता. १७) केले.

मराठवाडा मुक्ती स्वातंत्र्य संग्रामातील झुंजार स्वातंत्र्य सेनानी तथा बीड जिल्ह्याची माजी खासदार कॉ. गंगाधरअप्पा बुरांडे यांच्या स्मृतिस्थळावर आयोजित व्याख्यान प्रसंगी ते प्रमुख वक्ते म्हणून बोलत होते.यावेळी गावातील ज्येष्ठ कॉ.बाबूराव देशमुख, गावचे माजी सरपंच कॉ.सुदामदादा देशमुख,विद्यमान सरपंच,उपसरपंच आदींसह अनेक प्रमुख उपस्थिती होती.

मराठवाड्याबाबत सरकारची असलेली उदासीन भूमिका यावर परखड मत व्यक्त करताना देशमुख म्हणाले, की निजामाच्या जोखडीतून मराठवाडा बिनशर्त महाराष्ट्रात सामील झाला. ही मोठी चुकी केली का काय? असे मत आता शासनाच्या मराठवाड्याच्या विकासाबद्दल असलेल्या धोरणांवरून जनतेत निर्माण झाले आहे.

राज्यपालांच्या अखत्यारीत असलेला मराठवाड्याच्या विकासाला चालना देणार वैधानिक विकास महामंडळ हे राज्यपालांच्या अधिकारातून काढून केवळ विकास महामंडळ राबवून सत्ताधाऱ्यांनी ते स्वतःच्या हातात घेतले. महाराष्ट्रातील इतर जिल्ह्यांच्या मानाने शिक्षण, आरोग्य, रोजगार, व्यवसाय, औद्योगीकरण आदी सर्वच बाबतीत मराठवाडा हा मागासलेला भाग आहे.

शासनकर्ते केवळ १७ सप्टेंबर रोजी मराठवाड्याच्या विकासाबद्दल, अनुशेष पूर्ण करण्याच्या आश्वासनांची बरसात करतात. मात्र त्याची अंमलबजावणीच केली जात नाही, असेही ते म्हणाले. या स्मृती अभिवादन कार्यक्रमाचे प्रास्ताविक कॉ. गंगाधरअप्पा बुरांडे स्मृती प्रतिष्ठान अंबाजोगाईचे कॉ. एड. अजय बुरांडे यांनी केले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Fardad Kapus: फरदड कापसाचे पीक का घेऊ नये?

Fish Rate: बाजारात ताज्या मासळीचे दर तिप्पट

Sugarcane Bill: निळकंठेश्वर कारखान्यातर्फे चोवीस कोटी ३५ लाखांचे ऊसबिले अदा

PA Retirement Farewell:...अन् जिल्हाधिकारी झाले बॉडीगार्ड !

Sand Mining: नदीपात्रात वाहने उतरविल्याने वाळू उपशाला स्थगिती

SCROLL FOR NEXT