Turmeric Seed  Agrowon
ॲग्रो विशेष

Turmeric Seed : हळदीच्या बेण्याची मागणी वाढली

Turmeric Seed Market : हळदीच्या बेण्याची मागणी वाढली. या भागात हजारो क्विंटल हळद बेण्याची विक्री झाली आहे. काही जणांनी परराज्यातून बेणे आणून विक्री केली.

Team Agrowon

Washim News : हळदीला मागील दोन हंगामापासून चांगला दर मिळत असल्याने लागवड क्षेत्रात पुन्हा वाढ होऊ लागली आहे. हळदीच्या बेण्याची मागणी वाढली. या भागात हजारो क्विंटल हळद बेण्याची विक्री झाली आहे. काही जणांनी परराज्यातून बेणे आणून विक्री केली.

साधारणतः तीन-चार वर्षांपूर्वी हळदीला दर कमी मिळाल्याने अनेकांनी लागवड करणे सोडून दिले. याचा परिणाम क्षेत्र कमी झाले. सोबतच विविध कारणांनी हळदीच्या उत्पादनातही घट आली. गेल्या वर्षी हळद काढणीच्या वेळेस अवकाळी पावसाने थैमान घातल्यामुळे उत्पादकांचे मोठे नुकसान झाले.

मागील वर्षात हळदीची लागवड कमी झाल्यामुळे व हळदीला मागणी वाढल्यामुळे या हंगामात लागवडीकडे शेतकऱ्यांचा कल निर्माण होत आहे. आता हळदीच्या बेण्याची मागणी सर्वत्र वाढली आहे. स्थानिक शेतकऱ्यांकडे बेण्याची उपलब्धता कमी असल्याने काही जणांनी परराज्यातून हळदीचे बेणे आणून विक्री सुरू केली.

आतापर्यंत चार ते पाच हजार क्विंटल बेण्याची उलाढाल या भागात झाल्याचे समजते. भोकरखेड येथील शेतकरी सुभाष रंजवे यांनी शेतकऱ्यांची बेण्याची मागणी लक्षात घेत मध्य प्रदेशातून व्यापाऱ्यांच्या सहकार्याने हळद बेणे आणले. आजपर्यंत त्यांनी जवळपास साडेचार हजार क्विंटल हळदीच्या बेण्याची साडेतीन हजार रुपये प्रति क्विंटल दराने विक्री केली आहे.

या वर्षी हळद बियाण्याचा तुटवडा निर्माण झाला आहे. सुरुवातीला चार ते पाच हजार रुपये प्रतिक्विंटल दर देऊनही देणे मिळत नव्हते. आमच्या येथे या वर्षी हळद बियाण्याचा तुटवडा निर्माण झाला आहे. सुभाष रंजवे यांनी साडेतीन हजार रुपये क्विंटलने बेणे उपलब्ध करून दिल्यामुळे हळद लागवड करणाऱ्या शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. त्यांना बेण्याची उपलब्धता झाली आहे.
आकाश पाटील, शेतकरी, भोकरखेड, ता. रिसोड. जि. वाशीम

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra River Rejuvenation: अखेर नदी पुनरुज्जीवन प्राधिकरण स्थापन

POCRA Research Agreement: ‘पोकरा’अंतर्गत संवर्धित शेतीसाठी संशोधन करार

Supe Water Supply Scheme: डोक्यावरील हंडा उतरणार !

Revenue Officer Corruption: उपळाईचा मंडल अधिकारी लाच घेताना अटकेत

Rural Development: लोकाभिमुख होऊन गावांची विकासकामे करा: ग्रामविकासमंत्री जयकुमार गोरे

SCROLL FOR NEXT