Papaya Market Agrowon
ॲग्रो विशेष

Papaya Market : पपईला पाच रुपये प्रतिकिलो दराची मागणी

Papaya Rate : खानदेशातील अनेक भागांत काढणी बंद

Team Agrowon

अॅग्रोवन वृत्तसेवा
Jalgaon News : जळगाव : खानदेशात पपईदराचा तिढा पुन्हा एकदा तयार झाला आहे. जागेवर किंवा शिवार खरेदीत पाच रुपये प्रतिकिलोचा दर शेतकऱ्यांना मिळावा, अशी मागणी नंदुरबार, धुळ्यातील काही भागांत करण्यात येत आहे. मागणी मान्य होणार नाही तोपर्यंत काढणी बंद राहील, अशी भूमिका अनेक शेतकऱ्यांनी घेतली आहे.

जळगाव, धुळ्यातील काही भागांत पपईची काढणी अडीच ते तीन, साडेतीन रुपये प्रतिकिलो दरात खरेदीदार करीत आहेत. नंदुरबारात मात्र या दरांबाबत शेतकरी व काही संघटनांनी असहमती दाखविली असून, काढणी बंद ठेवल्याचे म्हटले आहे.

पपईची काढणी नंदुरबार जिल्ह्यातील शहादा व तळोदा भागांत बंद आहे. यामुळे या भागातील आवक मागील काही दिवसांपासून कमी आहे. परंतु धुळ्यातील शिरपुरातील काही गावे, जळगाव जिल्ह्यांत पपईची काढणी सुरू असून, प्रतिकिलो अडीच, तीन ते साडेतीन रुपये असा दर खरेदीदार देत आहेत. पपईच्या दरात सतत घट झाली असून, दर खरेदीदारांनी पाडून शेतकऱ्यांची आर्थिक पिळवणूक केल्याचा आरोप शेतकरी करीत आहेत.

ऑक्टोबरमध्ये पपईस सरासरी ३५ रुपये प्रतिकिलोचा दर जागेवर मिळाला, नोव्हेंबरमध्ये सुरुवातीला दर २० ते २५ रुपये प्रतिकिलो असे होते. डिसेंबरमध्ये मात्र दर सरासरी पाच रुपये प्रतिकिलोचा दर मिळाला, या महिन्यात मागील २० ते २२ दिवस पपईस सरासरी दर तीन रुपये प्रतिकिलो एवढाच मिळाल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. हा दर परवडत नाही. किमान पाच रुपये दर मिळाल्यास नुकसान कमी होईल, असे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.


बाजार समितीचा मध्यस्थीस नकार
पपईदराबाबत नोव्हेंबर व डिसेंबरमध्येही तिढा तयार झाला होता. त्या वेळेस नंदुरबारातील शहादा व धुळ्यातील शिरपूर बाजार समितीने मध्यस्थी करून दर निश्‍चित केले होते. त्यास काही शेतकऱ्यांनी सहमती दाखविली होती.

तर काहींनी नकार दिला होता. परंतु या वेळेस शहादा बाजार समितीने मध्यस्थीस नकार दिला असून, काही शेतकरी नेते व शेतकरी दरांबाबत मध्यस्थी करीत आहेत. शेतकऱ्यांनी जागेवर पाच रुपये प्रतिकिलोचा दर मिळावा, अशी मागणी केली आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Yavatmal Crop Insurance : यवतमाळच्या विम्यासंदर्भात सकारात्मक निर्णय घेऊ

Crop Insurance Scheme: नांदेडमध्ये पीकविमा योजनेत ९ लाखांहून अधिक अर्ज

Irrigation Projects : रखडलेल्या सिंचन प्रकल्पांना गती

Farm Loan Waiver: कर्जमाफी रक्कम वितरणास विलंब का? सहकारमंत्र्यांनी सांगितलं कारण

Mechanized Paddy Transplantation: यंत्राने भात लागवडीकडे वाढता कल

SCROLL FOR NEXT