Crop Insurance Company  Agrowon
ॲग्रो विशेष

Crop Insurance Company : पीकविमा कंपनीने फेटाळल्या २० हजारांवर पूर्वसूचना

Pre-Claim Notice : बुलडाणा जिल्ह्यात सततच्या पावसाने झालेल्या नुकसानाबाबत सुमारे दोन लाख १५ हजार शेतकऱ्यांनी विमा कंपनीकडे पूर्वसूचना दिली असून विविध कारणे देत २० हजारांवर सूचना फेटाळण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.

Team Agrowon

Buldana News : बुलडाणा जिल्ह्यात सततच्या पावसाने झालेल्या नुकसानाबाबत सुमारे दोन लाख १५ हजार शेतकऱ्यांनी विमा कंपनीकडे पूर्वसूचना दिली असून विविध कारणे देत २० हजारांवर सूचना फेटाळण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. ग्राह्य धरलेल्या सूचनांचे पंचनामे करण्याचे काम सुरू झाले आहे. या कामाची गती वाढवण्याची गरज आहे.

सततच्या पावसामुळे, अतिवृष्टीमुळे जिल्ह्यात विविध तालुक्यांत पिकांचे नुकसान झालेले आहे. या नैसर्गिक संकटामुळे शेतकऱ्यांच्या पिकांची उत्पादकता कमी होणार आहे, हे निश्‍चित आहे. यामुळे शेतकऱ्यांनी विमा कंपनीकडे पूर्वसूचना वेळेच्या आत दाखल केल्या आहेत. जिल्ह्यात दोन लाख १५ हजार ९०२ शेतकऱ्यांनी दाखल केलेल्या पूर्व सूचनांमध्ये सर्वाधिक २८ हजार २९६ शेगाव तालुक्यातील शेतकऱ्यांनी केलेल्या आहेत.

सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात पुन्हा जोरदार पाऊस पडला. यामुळे नुकसान आणखी वाढले. जिल्ह्यातील तेराही तालुक्यांमध्ये नुकसान झालेले असून शेतकऱ्यांनी विमा कंपनीकडे पूर्वसूचना दाखल केल्या. बुलडाणा तालुक्यात २७०४६, चिखली १२४८६, देऊळगावराजा ५६४६, जळगाव जामोद १९०५३, खामगाव १७०६४, लोणार ४५७७, मलकापूर ११७०६,

मेहकर ५९०८, मोताळा २४७२३, नांदुरा २२३९०, संग्रामपूर २४१०७, शेगाव २८२९६ आणि सिंदखेडराजा १२९०० अशा एकूण दोन लाख १५ हजार ९०२ शेतकऱ्यांनी पूर्वसूचना केल्या आहेत. यातील २०१८६ सूचना फेटाळल्या. यामध्ये डुप्लिकेट, उशिरा सूचना देणे, विमा काढण्यापूर्वीची घटना, अर्ज कोरा असणे, अशी कारणे दिली गेली.

मोताळ्यातील सर्वाधिक पूर्वसूचना फेटाळलेल्या

विमा कंपनीने २०१८६ पूर्वसूचना फेटाळल्या असून यात सर्वाधिक ३०१६ सूचना एकट्या मोताळा तालुक्यातील आहेत. याशिवाय बुलडाणा २५२५, चिखली १३५८, देऊळगावराजा ६१२, जळगाव जामोद १२७२, खामगाव १८५७, लोणार ५८१, मलकापूर १३१३, मेहकर ६२१, नांदुरा १७९०, संग्रामपूर १५९२, शेगाव २४१७ आणि सिंदखेडराजा १२३२ संख्या आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Weather : किमान तापमानात वाढ होण्याची शक्यता

Election 2024 Maharashtra: सुरुवातीच्या कलात महायुतीचं पारडं जड; महाविकास आघाडी देते टक्कर

Sugarcane Harvesting : निवडणूक आटोपली, खानदेशात ऊस तोड सुरू करा

Cashew Cluster Scheme : सिंधुदुर्ग-रत्नागिरीसाठी काजू क्लस्टर योजना

Banana Export : करमाळ्यातून केळीचा पहिला कंटेनर रशियाला रवाना

SCROLL FOR NEXT