Tur Crop Agrowon
ॲग्रो विशेष

Tur Cultivation : कारंजा तालुक्यात शेंगा परिपक्व होण्यापूर्वीच तुरीवर संकट

Climate Change : यंदाच्या खरीप हंगामात लागवड असलेल्या तुरीचे पीक वातावरणातील बदलाने आणि धुक्यामुळे संकटात सापडले आहे.

Team Agrowon

Washim News : यंदाच्या खरीप हंगामात लागवड असलेल्या तुरीचे पीक वातावरणातील बदलाने आणि धुक्यामुळे संकटात सापडले आहे. शेंगा परिपक्व होण्यापूर्वीच तुरीचे पीक काही ठिकाणी सुकत असल्याचे कारंजा तालुक्यातील अनेक शेतात पाहावयास मिळत आहे. त्यामुळे उत्पादनात निम्म्यापेक्षा अधिक घट येण्याची शक्यता शेतकरी वर्तवित आहे.

मागील काही दिवसांपासून ढगाळ वातावरण आहे. रात्री गारवा आणि सकाळी थंडी पडत असल्याने पिकावर विपरीत परिणाम झाल्याचे दिसून आले आहे. तुरीवर विविध प्रकारच्या अळ्यांचे आक्रमण झालेले आहे. त्यावर उपाय म्हणून शेतकऱ्यांनी महागड्या कीटकनाशकाची फवारणीही केली. परंतु अलीकडे मात्र वातावरणातील सततच्या बदलाने तुरीवरील हे संकट हाताबाहेर गेले आहे.

तुरीचे झाड शेंगा परिपक्व होण्यापूर्वीच सुकायला सुरुवात झाल्याने शेतकरी हतबल झाले आहेत. तूर हे कपाशी आणि सोयाबीन या पिकात आंतरपीक म्हणून घेतले जाणारे एक प्रमुख पीक आहे. यंदाच्या खरीप हंगामात कारंजा तालुक्यात जवळपास ७ हजार हेक्टरपेक्षा अधिक क्षेत्रावर तुरीची पेरणी करण्यात आली.

मागील काही वर्षी सरासरीपेक्षा अधिक पाऊस झाल्याने आणि शेतात सखोल भागात पाणी साचल्याने तुरीचे पीक जळून जात होते. परंतु यंदा मात्र शेतकऱ्यांनी यावर उपाय म्हणून सरी वरंबा पद्धतीने पेरणी केली.

त्यामुळे अधिक पावसातही तुरीचे पीक वाचले. तूर पिकाची परिस्थिती उत्तम असली तरी आता मात्र वातावरणातील बदलाने परिणाम होत आहे. शेंगा परिपक्व होण्यापूर्वीच तुरीचे पीक सुकू लागले आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Pune Fruit Market: उन्हाळी हंगामात फळे तेजीत

Education Reform: शिक्षणात सुधारणा ही सामूहिक जबाबदारी

Ethanol Fuel: इथेनॉल ठरेल पर्यायी इंधन

Namo Shetkari Mahasamman Yojana: ‘नमो’चा आठवा हप्ता पुढील आठवड्यात

Pune ZP: पुणे जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी वीरधवल जगदाळे

SCROLL FOR NEXT