Nashik Sugar Factory Agrowon
ॲग्रो विशेष

Nashik Sugar Factory : ‘नासाका’ सुरू करण्याचे धाडस शेतकरी, ऊस उत्पादक, कामगारांच्या विश्वासावर ; हेमंत गोडसे

Sugar Factory : नाशिक सहकारी साखर कारखाना पळसे, संचलित मे. अष्टलक्ष्मी शुगर, इथेनॉल अॅन्ड एनर्जी लि. या कारखान्याचा गळीत हंगामाचे गव्हाणपूजन व मोळी टाकण्याचा कार्यक्रम हेमंत गोडसे यांच्या हस्ते झाला.

Team Agrowon

Nashik News : नाशिक : दहा वर्षे बंद असलेला नाशिक सारखर कारखाना सुरू करताना अनंत अडचर्णीना सामोरे जावे लागले. त्यातूनही गेल्या दोन हंगामात आलेले अनुभव, झालेला तोटा याचा विचार करून चालु हंगामात पुन्हा नव्याने कारखाना सुरू करण्याचे धाडस शेतकरी, ऊस उत्पादक व कामगारांच्या विश्वासावर केले आहे, असे प्रतिपादन माजी खासदार हेमंत गोडसे यांनी केले.

नाशिक सहकारी साखर कारखाना पळसे, संचलित मे. अष्टलक्ष्मी शुगर, इथेनॉल अॅन्ड एनर्जी लि. या कारखान्याचा गळीत हंगामाचे गव्हाणपूजन व मोळी टाकण्याचा कार्यक्रम हेमंत गोडसे यांच्या हस्ते झाला. या वेळी गोडसे बोलत होते.

या वेळी ऊस उत्पादक निशांत वाघ, शरद कातकाडे, उल्हास जाधव, केशव तुपे, कैलास टिळे, संचालक बी. टी. कडलग, शेरझाद पटेल, सागर गोडसे, अजिंक्य गोडसे आदींच्या हस्ते गव्हाणीत मोळी टाकण्यात आली. या वेळी बाजार समिती संचालक तानाजी करंजकर, कॅन्टोन्मेन्ट बोर्डाचे माजी उपाध्यक्ष बाबूराव मोजाड, कैलास टिळे, विलास आडके, रमेश गायकर, नवनाथ गायधनी, ज्ञानेश्वर शिंदे, सुनील मोरे, अशोक आडके, गणपत गायधनी, जनार्दन जेजुरकर, माधवराव गायधनी, खंडू गायधनी, देविदास गायधनी, दिलीप गायधनी, आदी शेतकरी, अधिकारी, कर्मचारी, ऊसतोड कामगार उपस्थित होते.

गोडसे म्हणाले, की ऊस उत्पादकांना इतर कारखान्यांच्या तुलनेत भाव देणार असून मागील हंगामात एकरकमी २६०० रुपये दिलेले असून दुसरे दुसरे पेमेंट १०० रुपये वाढ करून देणार आहे. आगामी काळात कार्यक्षेत्रात गाळप क्षमतेपेक्षा जास्त ऊस निर्माण करण्याचा संकल्प केला आहे.

याकामी ऊस उत्पादकांना सुधारित बेणे व खते, देण्याचा मानस असल्याचे सांगितले तसेच शेतकऱ्यांना कोणतीही वजावट न करता १५ दिवसांच्या आत उसाचे पेमेंट करणार आहे. कार्यालयीन अधीक्षक सुधाकर गोडसे यांनी सूत्रसंचालन केले. जनरल मॅनेजर जे. सी. कुरणे यांनी आभार मानले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

PM Surya Ghar Yojana: सौरऊर्जेतून घरगुती, कृषीला शाश्‍वत वीजपुरवठा

Solar Agriculture Pump: सौरपंपासाठी शेतकऱ्यांच्या नशिबी रखडपट्टीच

Crop Loan: कर्ज पुनर्गठनाची अंमलबजावणी रखडली

Tomato Late Blight: टोमॅटो पिकावरील उशिराने येणारा करपा नियंत्रणाचे सोपे उपाय

Nanded Degloor Expressway: नांदेड–देगलूर ग्रीनफिल्ड द्रुतगती महामार्गाला मिळणार गती

SCROLL FOR NEXT