Paddy Fodder Agrowon
ॲग्रो विशेष

Paddy Rate : पेंढ्याला प्रतिकिलो केवळ दोन रुपयांचा भाव

Paddy Crop : वाडा तालुक्यातील बहुतांशी शेतकऱ्यांनी झोडणी आटोपून शेतात पेंढा (तण) रचून ठेवला आहे. जेणेकरून पेंढ्याला पुढील दिवसात चांगला भाव मिळेल. परंतु पावसाने भिजल्यानंतर व्यापाऱ्यांनी पेंढा खरेदीकडे पाठ फिरवली आहे.

Team Agrowon

Mumbai News : वाडा तालुक्यातील बहुतांशी शेतकऱ्यांनी झोडणी आटोपून शेतात पेंढा (तण) रचून ठेवला आहे. जेणेकरून पेंढ्याला पुढील दिवसात चांगला भाव मिळेल. परंतु पावसाने भिजल्यानंतर व्यापाऱ्यांनी पेंढा खरेदीकडे पाठ फिरवली आहे.

त्यामुळे शेतकऱ्यांनी साठवून ठेवलेला पेंढा विक्रीविना शेतातच पडून आहे. तर काही ठिकाणी पेंढ्याला प्रतिकिलो केवळ दोन रुपयांचा भाव मिळत असल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे.

तालुक्यातील पेंढा खरेदी करणारे स्थानिक छोटे-मोठे व्यापारी संगनमत करून हेतुपूर्वक काही दिवस पेंढा खरेदीकडे पाठ फिरवतात. तसेच मुंबई व वसई पट्ट्यात तबेल्यांचे व्यवसाय मोठ्या प्रमाणात आहेत.

तेथे पेंढ्याला मोठ्या प्रमाणात मागणी असून व्यापारी थेट पेंढा खरेदी करण्यासाठी येत असेल, तर हे स्थानिक व्यापारी त्यांना मज्जाव करत असतात. त्यांच्याशी हुज्जत घालून परत पाठवण्याचे प्रकार केले जातात. काही दिवसांनंतर अचानक शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन बाजारात मागणी नसल्याचे कारण ते देतात.

बाजारात मागणी कमी आहे, पावसाचा काही नेम नाही, तो कधीही पडू शकतो, अशी अनेक भीतीयुक्त कारणे पुढे करून हे स्थानिक पेंढा व्यापारी किमान पाच ते सहा किलोचा मोधळ (पेंढा) १० ते १२ रुपयाने खरेदी करतात. प्रतिोकिलो दोन रुपये भाव देऊन शेतकऱ्यांची लूट केली जाते.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farmers Loan Waiver: शेतकऱ्यांची कर्जमुक्तीकडे वाटचाल

Koyna Dam Water : कोयना धरणातून पाण्याचा विसर्ग पूर्णपणे बंद

Farm Equipment: मुरुडमध्ये अल्पभूधारकांना कृषी अवजारांचे वाटप

Ahilyanagar Agro Tourism : अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये कृषी पर्यटनाची निर्मिती करा

Research Paper Award: श्रीशैल्य हेगान्ना यांना रिसर्च अवॉर्ड

SCROLL FOR NEXT