Trump Mediation Agrowon
ॲग्रो विशेष

India Pakistan Conflict: भारत-पाकिस्तानातील संघर्ष अखेर थांबला

India Pakistan Conflict Stop: भारत आणि पाकिस्तान यांच्यातील संघर्ष अखेर थांबला आहे. पाकिस्तानच्या विनंतीनंतर भारताने शस्त्रसंधीचा निर्णय घेतलेला आहे. या वृत्ताला पाकिस्तानचे उपपंतप्रधान इशाक डार यांनी दुजोरा दिला आहे.

Team Agrowon

New Delhi News: भारत आणि पाकिस्तान यांच्यातील संघर्ष अखेर थांबला आहे. पाकिस्तानच्या विनंतीनंतर भारताने शस्त्रसंधीचा निर्णय घेतलेला आहे. या वृत्ताला पाकिस्तानचे उपपंतप्रधान इशाक डार यांनी दुजोरा दिला आहे. भारतासोबत शस्त्रसंधी झाल्याची माहिती डार यांनी दिली आहे. शनिवारी (ता. १०) सायंकाळी ५ वाजल्यापासून शस्त्रसंधी झालेली आहे.

भारत आणि पाकिस्तानचे लष्करी अधिकारी १२ मे रोजी बैठक घेणार आहेत. दोन्ही देशांनी थेट चर्चा केल्यानंतर हा निर्णय घेण्यात आल्याचे भारताकडून सांगण्यात आलेले आहे. पाकिस्तानच्या विनंतीवरून सैनिकी कारवाई थांबवल्याचे भारत सरकारकडून सांगण्यात आले आहे.

परराष्ट्र सचिव विक्रम मिस्री यांनी सांगितले, की जमीन, आकाश आणि समुद्राद्वारे होणाऱ्या सर्व कारवाया थांबविण्यात आल्या आहेत. पाकिस्तानच्या लष्करी ऑपरेशन्सचे महासंचालक यांनी भारतीय अधिकाऱ्यांशी संपर्क साधून शस्त्रसंधीची मागणी केली. भारताने आपल्या अटींवर शस्त्रसंधीस परवानगी दिली आहे. शनिवारी (ता.१०) सायंकाळी ५ वाजल्यापासून शस्त्रसंधीची घोषणा करण्यात आली आहे.

पाकिस्तानच्या लष्करी अधिकाऱ्यांनी भारताच्या डीजीएमआय यांच्याशी शनिवारी दुपारी साडेतीन वाजता फोनवरून चर्चा केली. दोघांमध्ये दोन्ही बाजूंकडील गोळीबार, जमिनी कारवाई तसेच हवाई आणि समुद्री कारवाई भारतीय वेळेनुसार शनिवारी संध्याकाळी ५ वाजल्यापासून थांबवण्याबाबत एकवाक्यता झाली. याबाबतच्या सूचना दोन्ही बाजूंना देण्यात आल्या आहेत. १२ मे रोजी १२ वाजता दोन्ही देशांचे डीजीएमओ चर्चा करतील, अशी माहिती भारताचे परराष्ट्र सचिव विक्रम मिस्री यांनी मंत्रालयाकडून शस्त्रसंधीची घोषणा केल्यानंतर शनिवारी सायंकाळी ५ वाजल्यापासून दोन्ही बाजूंनी कारवाया थांबल्या.

‘‘भारत आणि पाकिस्तानने शनिवारी गोळीबार आणि लष्करी कारवाई थांबविण्याबाबत सामंजस्य करार केला आहे. भारताने सर्व प्रकारच्या दहशतवादाविरोधात आजवर कोणतीही तडजोड न करता ठाम अशी भूमिका घेतलेली आहे आणि पुढेही घेत राहिल,’’
एस. जयशंकर, परराष्ट्रमंत्री

डोनाल्ड ट्रम्प यांची ‘एक्स’ पोस्ट

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी शनिवारी (ता. १०) भारत आणि पाकिस्तान शस्त्रविरामासाठी तयार झाल्याची घोषणा केली. त्यांनी या संदर्भात ‘एक्स’वर पोस्ट टाकून भारत आणि पाकिस्तानदरम्यान मध्यस्थी घडवून आणण्यासाठी अमेरिकेने प्रयत्न केल्याचा दावा केला.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Loan Waiver Issue: नांदेडमध्ये किसान सभेकडून कर्जमाफी आदेशाची होळी

Record Inspection: मिथेनॉल, गूळ व्यापाऱ्यांच्या नोंदवह्यांची तपासणी

Fodder Management: कमी पावसाच्या दृष्टीने चारा नियोजन कसे कराल?

Crop Loan Issues: परभणी जिल्ह्यात १,४७७ कोटी रुपयांचे बुडीत पीककर्ज

Banana Orchard Damage: नांदोरे, पेहेमध्ये केळी बागांचे नुकसान

SCROLL FOR NEXT