Chana Agrowon
ॲग्रो विशेष

Chana GI Rating : खारपाणपट्ट्यातील हरभऱ्याला 'जी आय'

Geographical Classification : पश्‍चिम विदर्भातील चार लाख हेक्‍टर विस्तारित खारपाणपट्टा अनेक वैशिष्ट्य जपून आहे. त्याच भागातील हरभरा देखील खारपट चव आणि टिकवण क्षमतेसाठी सर्वदूर नावारूपास आला आहे.

विनोद इंगोले : ॲग्रोवन वृत्तसेवा

Amravati News : पश्‍चिम विदर्भातील चार लाख हेक्‍टर विस्तारित खारपाणपट्टा अनेक वैशिष्ट्य जपून आहे. त्याच भागातील हरभरा देखील खारपट चव आणि टिकवण क्षमतेसाठी सर्वदूर नावारूपास आला आहे. याच हरभऱ्याला आता भौगोलिक मानांकन मिळाले असून, अंजनगावसुर्जी येथील ‘कार्ड’ (कम्युनिटी ॲक्‍शन फॉर रूरल डेव्हलपमेंट सोसायटी) संस्थेच्या नावावर याची नोंदणी झाली आहे.

पूर्णा नदीच्या खोऱ्यालगतचा असलेला भाग खारपाणपट्टा म्हणून ओळखला जातो. पूर्वी हा भाग समुद्राची खाडीचा होता. त्यानंतरच्या काळात ज्वालामुखीमुळे हा भूभाग निर्माण झाला, असे कृषी विद्यापीठाचे निरीक्षण आहे. अकोला, बुलडाणा, अमरावती या तीन जिल्ह्यांतील १६ तालुक्‍यांत हा खारपाणपट्टा आहे.

चार लाख १६ हजार हेक्‍टर जमीन यामुळे प्रभावित असून, या जमिनीचे वैशिष्ट्य म्हणजे पाण्याची उपलब्धता अधिक असली, तरी त्यात क्षाराचे प्रमाण अधिक आहे. त्यामुळे शेतीकामी त्याचा अपेक्षित वापर शक्‍य होत नाही. उन्हाळ्यात जमिनीला तडे जात असल्याने या भागात फळपीक घेणे शक्‍य होत नाही.

परिणामी, पारंपरिक पिकांवरच या भागातील शेतकऱ्यांची भिस्त आहे. कपाशी हे खरिपात, तर रब्बी हंगामात हरभरा हे मुख्य पीक घेतले जाते. या भागातील हरभऱ्याची टिकवणक्षमता अधिक आहे, त्यासोबतच खारपट चव असल्याने त्याला देशभरातून मागणी असते.

अशा प्रकारची वैशिष्ट्य जपणाऱ्या या हरभऱ्याला भौगोलिक मानांकन मिळावे याकरिता कार्ड संस्थेचे विजय लाडोळे यांनी पाठपुरावा केला होता. जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून याकरिता निधीची ३२ लाख रुपयांची उपलब्धता करून घेण्यातही ते यशस्वी झाले. त्यांचे हे प्रयत्न फळास येत खारपाणपट्ट्यातील हरभऱ्याला भौगोलिक मानांकन मिळाले आहे.

खारपाणपट्ट्यात अडचणी असल्या तरी संधीदेखील आहेत. त्याच शोधत आम्ही या भागातील पिकांना ओळख मिळवून देत त्यांना विस्तारित बाजारपेठ मिळेल, यासाठी धडपडत होतो. ‘जीआय’मुळे आमच्या या प्रयत्नाला यश आले आहे.
विजय लाडोळे, अध्यक्ष, कम्युनिटी ॲक्‍शन फॉर रूरल डेव्हलपमेंट सोसायटी (कार्ड), अंजनगावसुर्जी, अमरावती
खारपाणपट्ट्याचा विस्तार मोठा आहे. पोकरामधून या भागात सुधारणांवर भर दिला गेला आहे. आता या भागातील हरभऱ्याला भौगोलिक मानांकन मिळाल्याने या भागातील आधीच असलेल्या शेतीमाल बाजारपेठेचा आणखी विस्तार होईल, अशी अपेक्षा आहे.
राहुल सातपुते, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, अमरावती

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Monsoon Rain: मराठवाड्यात पावसाचा जोर कमीच; पूर्व विदर्भ आणि कोकणात पुढील ४ दिवस जोरदार पावसाचा अंदाज

Agrowon Podcast: गव्हाचे भाव स्थिरावले; डाळिंब तेजीत, मुग दबावात, केळीच्या दरात वाढ, उडदाचे भाव स्थिर

ZP School Admission : बोराखेडी जिल्हा परिषद शाळेत प्रवेश ‘ॲडमिशन फुल्ल’

Tree Plantation : जैवविविधता जपण्यासाठी वृक्षारोपण गरजेचे

Farmers Welfare: बच्चू कडू यांच्या मागण्यांना सरकारचा सकारात्मक प्रतिसाद; शेतकरी,मजुरांसाठी आश्वासने

SCROLL FOR NEXT