Onion Producing Farmer Agrowon
ॲग्रो विशेष

Onion Farmers Issue : केंद्रीय पथकाने जाणून घेतल्या कांदा उत्पादकांच्या समस्या

Team Agrowon

Solapur News : केंद्रीय कृषी व शेतकरी कल्याण मंत्रालयाच्या पथकाने गुरुवारी (ता.२६) सोलापूर जिल्ह्यातील कांदा उत्पादकांशी संवाद साधत कांदा लागवडीच्या माहितीसह कांदा उत्पादकांच्या अडचणी जाणून घेतल्या. तसेच त्यानंतर सोलापूर बाजार समितीतील कांदा लिलावाच्या पद्धतीची माहितीही घेतली.

केंद्रीय कृषी मंत्रालयाचे अव्वर सचिव जे.के. मनोज, कृषी विभागाचे उपसंचालक पंकज कुमार , सहायक संचालक मुकेश कुमार, पुण्याचे वरिष्ठ विपणन अधिकारी अच्युत सुरवसे, उपविभागीय कृषी अधिकारी नंदकुमार पाचकूडवे आदींचा या पथकात समावेश होता.

या पथकाने उत्तर सोलापूर तालुक्यातील वडाळा आणि दक्षिण सोलापूर तालुक्यातील मंद्रूप येथील शेतकऱ्यांच्या कांद्याची पाहणी केली. तसेच तेथील शेतकऱ्यांशी पीकपद्धती, लागवड, उत्पादन खर्च आणि मिळणारा दर या अनुषंगाने पथकाने चर्चा केली.

यावेळी शेतकऱ्यांनी कांद्याला दर मिळत नसल्याने उत्पादनखर्चही निघत नाही, अशी व्यथा मांडली. या चर्चेनंतर या पथकाने सोलापूर बाजार समितीला भेट दिली. बाजार समितीमध्ये परजिल्ह्यातून मोठ्या प्रमाणात कांदा विक्रीसाठी दाखल होत असतो.

बाजारात आवक झालेल्या कांद्याला मिळणारा योग्य दर, आडत आणि खरेदीदार व्यापाऱ्यांचा फायदा, सद्यःस्थितीतील पीकपद्धती, शेतमालाची उत्पादन क्षमता, कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या अडचणी, कांद्याला मिळणारा उत्तम दर, उच्चप्रतीचा कांदा लागवडीसह साठवणूक यांसह इतर विषयावर चर्चा करण्यात आली. यावेळी बाजार समिती मधील विविध विभागप्रमुखांनी आपल्या विभागाची सविस्तर माहिती केंद्रीय पथकाच्या अधिकाऱ्यांना दिली.

कांद्याची ५५ हजार हेक्टरची लागवड

सोलापर जिल्हयात यंदा आतापर्यंत ५३ हजार हेक्टरवर कांद्याची लागवड झाली आहे. जिल्ह्यातील उत्तर सोलापूर, दक्षिण सोलापूर, बार्शी, मोहोळ तालुक्यात कांद्याची सर्वाधिक लागवड होते. गेल्या दोन-तीन वर्षात लागवड क्षेत्रात मोठी वाढ झाली आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Return Monsoon : राज्यात काही ठिकाणी पावसाचा अंदाज; माॅन्सूनचा परतीचा प्रवास दोन दिवसांपासून पुन्हा थबकला

Soybean Crop Subsidy : सांगलीतील ३१ हजार सोयाबीन, कापूस उत्पादक शेतकऱ्यांना मिळणार ५ हजारांचे अनुदान

Pink Bollworm Infestation : बोंड अळीचा प्रादुर्भाव रोखण्यात यश

Crop Damage : अठ्ठावन्न हजार हेक्टरवरील कपाशी, सोयाबीनला फटका

Chana Production : हरभरा उत्पादन वाढीची सूत्रे

SCROLL FOR NEXT