Non-Basmati Rice Agrowon
ॲग्रो विशेष

Rice Export : केंद्राने बिगर बासमती तांदळाच्या निर्यातीवरील बंदी उठवली, अर्ध उकडलेल्या तांदळावरील निर्यात शुल्क देखील १० टक्क्यांवर आणले

Non-Basmati White Rice : गैर-बासमती पांढऱ्या तांदळाच्या निर्यातीवरील बंदी उठवण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला. या निर्णयामुळे तांदूळ उत्पादक शेतकऱ्यांसह निर्यातदारांचे उत्पन्न वाढेल, असा विश्वास निर्यातदार सूरज अग्रवाल यांनी व्यक्त केला आहे.

Aslam Abdul Shanedivan

Pune News : केंद्र सरकारने बिगर बासमती पांढऱ्या तांदळाच्या निर्यातीवरील बंदी तात्काळ उठवली आहे. अर्ध उकडलेल्या तांदळावरील निर्यात शुल्क देखील कमी करत २० टक्क्यांवरून १० टक्क्यांवर आणले आहे. सरकारने याआधी २०२३ मध्ये तांदळाच्या देशातील पुरवठा आणि किंमती नियंत्रण ठेवण्यासाठी निर्यात बंदी केली होती. पण आता बंदी हटवण्यात आल्यामुळे देशभरातील तांदूळ निर्यातदारांनी या निर्णयाचे स्वागत केले आहे.

देशांतर्गत बाजारात तांदळाची उपलब्धता आणि किमती नियंत्रित ठेवण्यासाठी केंद्र सरकारने जुलै २०२३ मध्ये निर्यातीवर बंदी केली होती. ती आता उठवली आहे. तसेच अर्ध उकडलेला (पारबॉइल्ड) तांदळावरील निर्यात शुल्क २० टक्क्यांवरून १० टक्के केली आहे. यादरम्यान रॉयटरच्या एका रिपोर्टनुसार यंदा चांगल्या पावसाच्या अंदाजामुळे शेतकऱ्यांनी ४१.३५ लाख हेक्टर क्षेत्रावर भाताची लागवड केली आहे. गेल्या वर्षी देशात भात लागवड ४०.४५ दशलक्ष हेक्टर क्षेत्रावर झाली होती. तर गेल्या पाच वर्षात सरासरी क्षेत्राच्या ४०.१ लाख हेक्टरपेक्षा जास्त आहे.

याआधी २०२३ मध्ये पारबॉईल्ड तांदळाच्या कमतरतेमुळे सरकारने निर्यातीवर २० टक्के निर्यात शुल्क लावले होते. पण आता निर्यात शुल्कात कपात करण्यात आली असून ती १० टक्के केली आहे. तर ब्राऊन राईस आणि हातसडीच्या (पॉलिश न केलेला) तांदळावरील निर्यात शुल्क देखील कमी करून १० टक्के करण्यात आली आहे.

तसेच पांढऱ्या तांदळावरील निर्यात शुल्क शुन्य करण्यात आला आहे. सरकारने पांढऱ्या तांदळावरील निर्यात शुल्क पूर्णपणे काढून टाकली आहे. मात्र खाजगी व्यापाऱ्यांना निर्यातीस परवानगी दिली जाईल की नाही हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon Podcast: सोयाबीन दरात चढ-उतार, गवार भावात घसरण, पालक आवकेत घट, वांगी दरात चढ-उतार तर डाळिंब दरात बदल

NCC Colonel Commandant Degree: कुलगुरू डॉ. शरद गडाख यांना मानद ‘कर्नल कमांडंट’ पदवी

Analog Paneer Ban: राज्यात कृत्रिम (एनालॉग) पनीरवर वर्षभराची बंदी

Water Conservation: श्रमदानातून पाणीदार झाले ‘सालईबन’

Maharashtra Rain Update: कोकण आणि घाटमाथ्यावर पावसाचा इशारा; मराठवाड्यात हलक्या सरी शक्य

SCROLL FOR NEXT