Coconut  Agrowon
ॲग्रो विशेष

Coconut MSP : नारळ उत्पादक शेतकऱ्यांसाठी गुडन्यूज!, सुके खोबऱ्याच्या एमएसपीत ४२० रुपयांनी वाढ

Coconut Market : केंद्र सरकारने शुक्रवारी (ता. २०) २०२५ हंगामासाठी सुक्या खोबऱ्याचे (कोपरा) किमान आधार मूल्य (एमएसपी) ४२० रुपये प्रतिक्विंटलने वाढवले आहे.

Aslam Abdul Shanedivan

Central Government Increased the MSP of coconut : केंद्र सरकारने २०२५ हंगामासाठी सुक्या खोबऱ्याच्या (कोपरा) किमान आधार मूल्यात ४२० रुपये प्रतिक्विंटलने वाढ केली आहे. याबाबत शुक्रवारी (ता.२०) केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय घेण्यात आला. यामुळे २०२५ सालासाठी सुक्या खोबऱ्याला मिलिंग खोबऱ्यासाठी एमएसपी ११ हजार ५८२ रूपये प्रति क्विंटल तर बॉल खोबऱ्याचा एमएसपी १२ हजार १०० रूपये रूपये प्रति क्विंटल असेल. याबाबतची माहिती केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी दिली आहे.

यावेळी मंत्री अश्विनी वैष्णव म्हणाले, केंद्र सरकारने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील बैठकीत याबाबत निर्णय घेतला. यानिर्णयामुळे आता सुक्या खोबऱ्याच्या (कोपरा) किमान आधार मूल्यात ४२० रुपयांची वाढ करण्यात आली आहे. ज्याचा फायदा शेतकऱ्यांना होईल.

हा निर्णय शेतकऱ्यांच्या हितासाठी घेण्यात आला असून एक महत्वाचे पाऊल आहे. या निर्णयावरून पंतप्रधान शेतकऱ्यांचे जीवनमान सुधारण्यासाठी कटिबद्ध असल्याचे दिसून येते. सध्या देशात आता सुक्या खोबऱ्याचे (कोपरा) उत्पादन कर्नाटकात सर्वाधिक होत आहे.

नाफेड आणि एनसीसीएफ यांची सुक्या खोबऱ्याची खरेदी करण्यासाठी केंद्रीय नोडल एजन्सी म्हणून नियुक्त करण्यात आली आहे. याशिवाय राज्य सरकारे देखील महत्वाची भूमिका पार पाडतील, असेही अपेक्षा वैष्णव यांनी व्यक्त केली आहे. तर राज्य सरकारे त्यांच्या महामंडळांच्या माध्यमातून सुक्या खोबऱ्याची खरेदी प्रक्रिया पूर्ण करतील, असेही वैष्णव यांनी म्हटलं आहे.

केंद्र सरकारने केंद्रीय अर्थसंकल्प २०१८-१९ मध्येच सुक्या खोबऱ्याच्या किमान आधारभूत किमतीत वाढ करण्याचा निर्णय घेतला होता. त्याप्रमाणे याआधी वाढ करण्यात आली आहे. आता शेतकऱ्यांना किफायतशीर भाव देण्यासाठी मंत्रिमंडळ समितीने २०२५ हंगामासाठी सुक्या खोबऱ्याच्या किमान आधारभूत मूल्यात वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे.

एमएसपी ४२० रुपयांनी वाढला

मिलिंग सुक्या खोबऱ्याचा वापर (कोपरा) तेल काढण्यासाठी जातो. तर खाण्यायोग्य सुके खोबरे सुकामेवा म्हणून किंवा धार्मिक कारणांसाठी वापरला जातो. केरळ आणि तामिळनाडू हे दशलक्ष कोप्राचे प्रमुख उत्पादक आहेत, तर बॉल कोप्राचे उत्पादन प्रामुख्याने कर्नाटकात होते. मागील हंगामाच्या तुलनेत २०२५ च्या हंगामात सुक्या खोबऱ्यासाठी (मिलिंग) एमएसपी ४२० रुपये प्रति क्विंटल आणि बॉल सुक्या खोबऱ्याच्या किंमतीत १०० रुपये प्रति क्विंटलने वाढ झाली आहे.

गेल्या १० वर्षांमध्ये, सरकारने सुके खोबरे आणि बॉल बॉल सुक्या खोबऱ्याच्या मिलिंगसाठी एमएसपी २०१४-१५ मध्ये ५ हजार २५० रुपये प्रति क्विंटल आणि ५ हजार ५०० रुपये प्रति क्विंटल वरून ११ हजार ५८२ रुपये प्रति क्विंटल आणि २०१२ मध्ये सुमारे १२ हजार १०० रुपये प्रति क्विंटलपर्यंत वाढवली होती.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Union Budget 2026: कृषी शिक्षण, संशोधनावरील तरतूद वर्षागणिक तोकडीच

Bharat-VISTAAR AI: अर्थसंकल्पातून 'भारत विस्तार एआय'ची घोषणा, याचा शेतकऱ्यांना कसा होईल फायदा?

Sandlwood Cultivation : चंदन लागवडीसाठी अर्थसंकल्पात तरतूद; पाच राज्यांमध्ये चंदनाची सर्वाधिक लागवड

Groundwater Management: सर्व विभागाच्या समन्वयातून भूजल व्यवस्थापनाची गरज

Union Budget 2026: कृषी, ग्रामीण उद्योगासह शेतकरी हिताचा संकल्प

SCROLL FOR NEXT