Team Agrowon
सरकारने बुधवारी (ता. २७) २०२४ हंगामासाठी सुक्या खोबऱ्याचे (कोपरा) किमान आधार मूल्य (एमएसपी) २५० ते ३०० रुपये प्रतिक्विंटलने वाढवून ११,१६० ते १२,००० रुपये प्रतिक्विंटल करण्याची घोषणा केली.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या आर्थिक व्यवहारावरील कॅबिनेट समितीच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.
माहिती आणि प्रसारण मंत्री अनुराग ठाकूर यांनी पत्रकारांना सांगितले, की जागतिक स्तरावर खोबऱ्याच्या किमती घसरल्या आहेत.
पण मोदी सरकारने उत्पादन खर्चापेक्षा किमान ५० टक्के जास्त ‘एमएसपी’ देण्याचा निर्णय घेतला आहे.
अशा परिस्थितीत २०२४ च्या हंगामासाठी खोबऱ्याच्या ‘एमएसपी’मध्ये २५०-३०० रुपये प्रति क्विंटलने वाढ करण्यात आली आहे.
ते म्हणाले, की योग्य आणि सरासरी गुणवत्तेच्या गोटा खोबऱ्याच्या ‘एमएसपी’मध्ये २५० रुपये प्रतिक्विंटलने वाढ करण्यात आली आहे, तर पुढील वर्षासाठी मिलिंग खोबऱ्याच्या समर्थन मूल्यात ३०० रुपये प्रतिक्विंटलने वाढ करण्यात आली आहे.