ZP Nagpur Agrowon
ॲग्रो विशेष

Nagpur ZP Budget : नागपूर जिल्हा परिषदेचा अर्थसंकल्प ४० कोटींच्या घरात

Budget Update : जिल्हा परिषदेचा वर्ष २०२४-२५ चा अर्थसंकल्प हा ४० कोटींच्या राहण्याची शक्यता आहे. राज्य शासनाने अनुदानाची रक्कम अद्याप दिली नसल्याने त्याचा परिणाम अर्थसंकल्पावर होणार आहे.

Team Agrowon

Nagpur News : जिल्हा परिषदेचा वर्ष २०२४-२५ चा अर्थसंकल्प हा ४० कोटींच्या राहण्याची शक्यता आहे. राज्य शासनाने अनुदानाची रक्कम अद्याप दिली नसल्याने त्याचा परिणाम अर्थसंकल्पावर होणार आहे. त्यामुळे या आर्थिक वर्षापेक्षा तो कमीचा राहण्याचाही अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.

प्रशासनाने अर्थसंकल्पाच्या दृष्टिकोनातून तयार सुरू केली आहे. मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) सौम्या शर्मा यांनी यासंदर्भात आढावा घेतला. विविध विभागांकडून करण्यात आलेल्या मागणीची माहिती त्यांनी घेतली. लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लक्षात घेता सत्ताधाऱ्यांकडून अर्थसंकल्प सादर करण्याची घाई होत आहे.

अर्थसंकल्प सादर करण्यावरून ही सत्ताधाऱ्यांमध्ये एकमत नसल्याचे समजते. वर्ष २०२३-२४ साठी ४० कोटी ६९ लाखांचा अर्थसंकल्प वित्त सभापती राजकुमार कुसुंबे यांनी सादर केला होता. परंतु अद्याप शासनाकडून अनुदानाची अपेक्षित रक्कम आली नाही. त्यामुळे वर्ष २०२३-२४ च्या सुधारित अर्थसंकल्पात सादर करताना तो कमी होण्याची शक्यता आहे.

शासनाकडून साधारणतः अनुदानाची रक्कम मार्च अखेरीस येते. निवडणुकीचे वर्ष असून येथे राज्य सरकारच्या विरोधातील सत्ता आहे, त्यामुळे शासनाकडून निधीही कमी मिळण्याचा अंदाज सत्ताधाऱ्यांसह प्रशासनाला आहे. शिवाय सत्ताधाऱ्यांकडून अर्थसंकल्प लवकर सादर करण्याच्या हालचाली आहेत.

त्यामुळे ‘तिजोरी’ मधील रक्कम लक्षात घेता अर्थसंकल्प सादर होणार असल्याचे सूत्रांकडून समजते. वर्ष २०२३-२४ साठी ४० कोटी ६९ लाखांचा अर्थसंकल्प सादर करण्यात आला होता. वर्ष २०२४-२५ अर्थसंकल्प ४० कोटी किंवा त्यापेक्षा कमीचा राहणार असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.

वित्त विभागाला हवा स्वतंत्र निधी

वित्त विभागाला खर्चासाठी आवश्यक निधी हा सामान्य प्रशासन विभागामार्फत देण्यात येते. परंतु आता वित्त विभागाला खर्चासाठी स्वतंत्र निधी हवा आहे. तशी मागणीही त्यांच्याकडून करण्यात आली आहे. त्यांच्या मागणीमुळे मोठा आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farmer Relief: नाशिकसह तीन जिल्ह्यांतील १ लाख ४५ हजार शेतकऱ्यांना दिलासा, ८६ कोटी ६५ लाख मदत मंजूर

Agri University Research : कृषी विद्यापीठाची संशोधनात ओळख अधिक बळकट होईल

Ring Road Project : रिंग रोड बाधितांचा शासनाविरोधात एल्गार

Murrah Buffalo Subsidy: मुऱ्हा म्हैस खरेदीसाठी ‘चितळे’ देणार अनुदान

Kisan Credit Card : किसान क्रेडिट कार्ड, पशू किसान क्रेडिट कार्डातील अडचणी सोडवा

SCROLL FOR NEXT